मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर गोविंदांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न भाजपसह सर्वच राजकीय पक्षांकडून सुरु झाला आहे. दहीहंडीसाठी थरांची मर्यादा नको, अशी भूमिका राज्य सरकार मुंबई उच्च न्यायालयात मांडणार आहे.
एवढंच नाही तर 12 वर्षांपर्यंतच्या गोविंदांना दहीहंडीत सहभागी होऊ द्या, अशी विनंतीही सरकारच्या वतीने हायकोर्टात केली जाणार आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती दहीहंडी उत्सव समितीची बैठक घेण्यात आली. त्यात दहीहंडीचे नियम शिथील करण्याची भूमिका सरकारने घेतली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या 2014 च्या आदेशानुसार, सध्या 18 वर्षांखालील गोविंदाला दहीहंडी उत्सवात सहभाही होता येत नव्हतं. शिवाय 20 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या थरही लावता येत नव्हता.
परंतु 2014 सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाच्या 20 फूट उंच थराच्या मर्यादेला स्थगिती दिली होती. तसंच गोविंदांची वयोमर्याद 18 वरुन 12 वर्षांवर आणली होती. आता सर्वोच्च न्यायालयाचा 2014 मधील निर्णय अंतिम राहावा, अशी भूमिका राज्य सरकार उच्च न्यायालयात मांडणार आहे.