बीडमध्ये मल्टीस्टेट पतसंस्थेत चोरी, लाखोंचा मुद्देमाल लंपास
एबीपी माझा वेब टीम | 10 May 2017 07:53 AM (IST)
बीड : आष्टी तालुक्यातील धामणगावमध्ये महेश मल्टीस्टेट पतसंस्थेत चोरट्यांनी चोरी केली आहे. पतसंस्थेचं शटर फोडून तिजोरीसहित दोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. विशेष म्हणजे चोरट्यांनी १०० किलो वजनाची तिजोरीही उचलून नेल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. धामणगावमधील महेश मल्टीस्टेट पतसंस्थेचं शटर तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. यात 100 किलोंच्या तिजोरीसह 7 हजार रुपयांचा डीव्हीआर घेऊन चोरट्यांनी केला. या तिजोरीची किंमत जवळपास 75 हजार रुपये आहे, तर तिजोरीत 1 लाख 20 हजार रुपयांची रोकडही होती. चोरट्यांनी 2 लाख 2 हजारांचा हा सर्व मुद्देमाल लंपास केला आहे. सीसीटीव्ही फुटेजचे रेकॉर्ड असलेला डीव्हीआरही चोरट्यांनी लंपास केल्यानं पोलिसांसमोर तपासाचं आव्हान उभं राहिलं आहे.