नवी दिल्ली : भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण यांना पाकिस्तानने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ‘रॉ’चे एजंट असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानमध्ये अटक  झालेल्या भारताच्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमधील रावळपिंडी कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती.


पाकिस्तानने सुनावलेल्या शिक्षेविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. पाकिस्तानने भारताला कोणतीही माहिती न देता बेकायदशीरपणे फाशीची शिक्षा सुनावली, असा दावा भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात केला होता.

दरम्यान पाकिस्तानकडून याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे पाकिस्तान सरकार यावर काय बोलतं, त्याकडे लक्ष सर्वांचं लागलं आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तानला आपली बाजू मांडावी लागणार आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय हा भारतासाठी मोठा विजय मानला जात आहे. कारण भारताने तब्बल 16 वेळा कुलभूषण जाधव यांच्याशी काऊन्सिलर अॅक्सेस देण्यासाठी विनंती केली होती. मात्र पाकिस्तानने ही मागणी फेटाळली. त्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढील प्रक्रिया काय?

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयावर पाकिस्तानची प्रतिक्रिया महत्वाची आहे. कुलभूषण जाधव यांना भेटण्याचीही परवानगी पाकिस्तानने दिली नव्हती. जगभरात या कायदेशीर बाबी पाळल्या जातात. त्यामुळे यावर पाकिस्तान काय बाजू मांडणार ते महत्वाचं असेल.

जाणकारांच्या मते पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे आदेश पाळावे लागतील. कारण जगभरातील जवळपास 195 देश या न्यायालयाशी संलग्नित आहेत. पाकिस्तानला यामधून बाहेर पडणं परवडणारं नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दबाव पाकिस्तानवर राहिलं.

कुलभूषण यांच्या आईला आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय कळवला : सुषमा स्वराज

परराष्ट्र मंत्रालयाकडून कुलभूषण यांच्या सुटकेसाठी सतत प्रयत्न चालू होते. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज स्वतः कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात होत्या. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या या निर्णयाची माहिती कुलभूषण जाधव यांच्या आईला दिली असल्याचं सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे.

कुलभूषण जाधव प्रकरणी ज्येष्ठ वकील हरिश साळवे भारताची बाजू आंतरराष्ट्रीय न्यायालयात मांडत आहेत, अशी माहिती सुषमा स्वराज यांनी दिली.

कोण आहेत कुलभूषण जाधव?
कुलभूषण जाधव यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप लावत बलुचिस्तान प्रांतात त्यांना गेल्या वर्षी 3 मार्च 2016 मध्ये अटक झाली होती. जाधव कुटुंबीय मूळचं सांगलीचं असून सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. कुलभूषण यांचे वडील मुंबई पोलिस दलाचे माजी कर्मचारी आहेत.

जाधव यांनी नौदलातून निवृत्ती स्वीकारुन व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यामुळे आपला मुलगा हेर असल्याचा आरोप जाधव कुटुंबीयाने फेटाळून लावला आहे. ‘माझ्या मुलाला यात अडकवण्यात आलं आहे. कुलभूषण इराणच्या चबाहारमध्ये सल्लागार म्हणून व्यवसाय करतो,’ अशी माहिती त्यांच्या वडिलांनी दिली होती.

बलुचिस्तानात अटक

कुलभूषण जाधव यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप लावत बलुचिस्तान प्रांतात त्यांना गेल्या वर्षी 3 मार्च 2016 मध्ये अटक झाली होती. जाधव कुटुंबीय मूळचं सांगलीचं असून सध्या मुंबईत वास्तव्यास आहे.

हेरगिरीच्या संशयावरुन माजी नौदल अधिकाऱ्याला पाकमध्ये अटक

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानने केलेले सर्व आरोप फेटाळले होते. कुलभूषण जाधव हे आपल्या व्यवसायानिमित्त पाकिस्तानमध्ये असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला होता. कुलभूषण जाधव मूळचे मुंबईचे रहिवासी असून त्यांचे वडील मुंबई पोलिस दलाचे माजी कर्मचारी आहेत.

जाधव यांनी नौदलातून निवृत्ती स्वीकारुन व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यामुळे आपला मुलगा हेर असल्याचा आरोप जाधव परिवाराने फेटाळून लावला आहे.’ माझ्या मुलाला यात अडकवण्यात आलं आहे. कुलभूषण इराणच्या चबाहारमध्ये सल्लागार म्हणून व्यवसाय करतो.

कथित कबुलीनाम्याचा व्हिडीओ

यापूर्वी  पाकिस्तानकडून कुलभूषण जाधव यांच्या कथित कबुलीनाम्याचा व्हिडीओ जारी केला होता. या व्हिडीओत कुलभूषण जाधव यांनी आपण रॉ एजंट असल्याचं मान्य केल्याचा दावा, पाकिस्तानने केला होता. मात्र भारताने या व्हिडीओच्या सत्यतेवर आक्षेप घेतला होता.

कुलभूषण जाधवांच्या कथित कबुलनाम्याच्या व्हिडिओत 102 कट्स

संबंधित बातम्या :

कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणण्यासाठी जोरदार हालचाली


कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी कोर्टाकडून फाशीची शिक्षा


कुलभूषण जाधव यांच्या मित्राशी बातचीत


कुलभूषण जाधवविरोधात निर्णायक पुरावे नाहीत, पाकची कबुली


हेरगिरी प्रकरणी अटकेतील कुलभूषण जाधवांचा कबुलीनामा ?


हेरगिरीच्या संशयावरुन माजी नौदल अधिकाऱ्याला पाकमध्ये अटक


कुलभूषण जाधव यांच्याकडे दोन पासपोर्ट : पाकिस्तान


… तर आम्ही ही पूर्वनियोजित हत्या समजू, भारताने पाकला खडसावलं


भारताचा आक्रमक पवित्रा, पाकिस्तानच्या 12 कैद्यांची सुटका रद्द


हेरगिरीच्या संशयावरुन माजी नौदल अधिकाऱ्याला पाकमध्ये अटक