भाईंदर : नायगांव आणि भाईंदर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान असलेल्या भाईंदर खाडी पूलावरुन (Bhayander khadi bridge) आज (शुक्रवारी) दुपारच्या सुमारास एका तरुण आणि तरुणीने खाडीत उडी मारल्याची घटना घडली आहे. यात पोलिसांच्या जागरुकतेमुळे तरुणाला वाचवण्यात यश आलं आहे. तर तरुणीचा शोध सुरु आहे. हे दोघेही नातेवाईक असल्याचंही समोर येत आहे.


संबधित दोघेही औरंगाबादचे राहणारे आहेत. तरुणाच नाव संदीप खरात तर तरुणीच नाव कोमल दणके असं आहे. दोघांच वय 19 वर्ष असल्याचंही समोर येत आहे. मुलगी सध्या उल्हासनगर येथे राहण्यास आहे. शुक्रवाी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हे दोघेही रेल्वे रुळावरुन नायगांवहून भाईंदरच्या दिशेने जात होते. त्यावेळी रुळाखाली तैनात असलेल्या राजेंद्र चव्हाण या पोलीस हवालदारांनी दोघांना टोकलं. माञ त्यांनी आपल्याकडे तिकिट काढायचे पैसे नसल्याने आपण भाईंदरला चालत जात असल्याच सांगितलं. ज्यानंतर त्यांनी अचानक पुलावरुन उडी मारली. दोघांनी उडी मारल्यानंतर चव्हाण यांनी स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने संदीपला वाचवण्यात यश मिळवलं. तर कोमलचा मात्र अद्यापती शोध लागलेला नाही.


पोलिसांसह अग्निशम दल तपासात व्यस्त


वसई विरार शहर महानगरापालिकेचं अग्निशमन दलाच पथक, स्थानिक मच्छिमार आणि पोलीस तिचा शोध घेत आहेत. तरुणाला बाहेर  काढल्यानंतर त्याने मुलीला चक्कर आल्याने ती पाण्यात पडली आणि मी तिला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारल्याचं सांगितलं आहे.  सध्या संदीप याला रुग्णालयात उपचारकरता पाठवलं आहे. तर मुलीचा शोध सुरु आहे.


हे ही वाचा-



दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा