सांगली: सांगलीतील तासगाव शहरात भाऊबीजेसाठी जात असलेल्या एका महिलेचा रस्त्यावरील खड्ड्यामुळे घसरून बसखाली चिरडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
माया शिवाजी चव्हाण असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तासगाव शहरातील गणपती मंदिर परिसरात दुचाकीवरून धनंजय शिवाजी चव्हाण व त्यांची आई माया शिवाजी चव्हाण हे दोघे भाऊबीज सणासाठी विटा शहराकडे जात होते, त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली.
गणपती मंदिरजवळ नगरपालिकेच्या ड्रेनेजच्या खड्डयावर काही लोकांनी नारळाचे फड फेकले होते. त्या खड्ड्यात चव्हाण यांची गाडी आदळली व घसरली. यावेळी माया कदम गाडीवरून खाली पडल्या, त्याचवेळी मागून आलेल्या बसखाली माया शिवाजी चव्हाण चिरडल्या गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.
रस्त्यावरील खड्ड्यांकडे तासगाव पालिका, स्वच्छता कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे एका महिलेच्या जीवावर बेतले असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटू लागली आहे.
भाऊबीजेला जाताना महिलेचा बसखाली चिरडून मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Nov 2018 07:29 PM (IST)
माया शिवाजी चव्हाण असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तासगाव शहरातील गणपती मंदिर परिसरात दुचाकीवरून धनंजय शिवाजी चव्हाण व त्यांची आई माया शिवाजी चव्हाण हे दोघे भाऊबीज सणासाठी विटा शहराकडे जात होते, त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -