कास पठाराकडे जाणारा रस्ता खचला; वाहतूक बंद, पर्यटक अडकले
एबीपी माझा वेब टीम | 02 Oct 2017 03:37 PM (IST)
ज्यावेळी हा रस्ता खचला त्यावेळी रात्र होती. सुदैवाने रस्त्यावर कुठलंही वाहन नव्हतं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
सातारा : साताऱ्याहून जगप्रसिद्ध कास पठाराकडे जाणाऱ्या यवतेश्वर घाट माथ्यावरचा रस्ता खचला आहे. यामुळे घाटातली वाहतूक बंद करण्यात आली आहे. ज्यावेळी हा रस्ता खचला त्यावेळी रात्र होती. सुदैवाने रस्त्यावर कुठलंही वाहन नव्हतं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. परंतु रस्ता खचल्याने कास पठाराकडे जाणारे अनेक पर्यटक घाटातच अडकले आहेत. कास पठारात या काळात विविध प्रकारची फुलं उमलतात. ती पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते. मात्र घाटाचा रस्ता खचल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. तसंच सलग सुट्ट्यांमुळे अनेकांनी इथे ऑनलाईन बुकिंग केली होती होती. त्यांचंही बुकिंग वन विभागाने रद्द केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे पाऊस नसतानाही रस्ता नेमका कशामुळे खचला, याचं नेमकं कारण अजून कळू शकलेलं नाही.