पुणे/कोल्हापूर : महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्ताने देशभर स्वच्छता अभियान राबवलं जात आहे. मात्र महाराष्ट्रात काही नेत्यांकडून नौटंकी सुरु असल्याचं दिसत आहे. कारण कचरा नसलेल्या ठिकाणी जाऊन हे नेते मंडळी स्वच्छता करत आहेत.

पुण्यामध्ये गांधी जयंतीच्या मुहूर्तावर महापालिकेने स्वच्छता अभियानाला सुरुवात केली. महापौर मुक्ता टिळक यांनी अशा ठिकाणी झाडू मारला जिथे कचराच नव्हता. त्यामुळे फक्त फोटोसाठी स्वच्छता अभियान आहे का, हा प्रश्नच आहे.



दुसरीकडे कोल्हापुरात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही झाडू मारला. पण इथं फक्त झाडाची वाळलेली पानं होती. त्यामुळे नेत्यांनी फक्त सोपस्कार पूर्ण केला का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.



पंतप्रधान मोदी यांनी गांधी जयंतीच्या दिवशीच स्वच्छता अभियानाची सुरुवात केली होती. त्यानंतर देशामध्ये स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. नागरिकांनी सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत वैयक्तिकरित्याही स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.

नागरिकांना स्वच्छतेसाठी पुढाकार घेण्याचं आवाहन करणारे नेतेच स्वतः फक्त सोपस्कार पूर्ण करत असल्याचं दिसत आहे.

पाहा व्हिडिओ :