धुळ्यातील साक्रीमध्ये प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, तिघेजण जखमी
एबीपी माझा वेब टीम | 01 Dec 2017 09:18 PM (IST)
धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात आज (शुक्रवार) थोड्याच वेळापूर्वी प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं. या अपघातात पायलटलसह दोघेजण जखमी झाले आहेत.
धुळे : धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात आज (शुक्रवार) थोड्याच वेळापूर्वी प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं. या अपघातात पायलटलसह दोघेजण जखमी झाले आहेत. साक्री तालुक्यातल्या शेवाळी फाट्याजवळच्या एका शेतामध्ये या विमानाचं क्रॅश लँडिंग झालं. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानं हे विमान कोसळलं. दरम्यान, विमानात बिघाड झाल्याचे लक्षात येताच वैमानिकानं तात्काळ विमान नागरी वस्तीपासून दूर नेलं. वैमानिकानं वेळीच दाखवलेल्या या प्रसंगावधानानं मोठी दुर्घटना टळली. मात्र, हे विमान नेमकं कुठे चाललं होतं आणि यामध्ये कशामुळे बिघाड झाला होता. याबाबत कोणतीही माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.