औरंगाबाद : ‘यापुढे रस्त्यावर किमान 10 वर्ष खड्डे पडणार नाहीत.’ अशी हमी सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी दिली आहे. तसंच सध्याचे खड्डे 15 डिसेंबरपर्यंत बुजवणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. औरंगाबादेत ते बोलत होते.


‘साडेअडोतीस हजार कोटींच्या रस्त्यांच्या कामांची सुरुवात जानेवारीपासून होणार आहे. ही कामं सुरु झाल्यानंतर महाराष्ट्रातील रस्त्यांचं चित्र नक्कीच बदलेल. कारण की, हे रस्ते सिमेंट क्राँकिटचे असल्यानं पुढील 10 ते 15 वर्ष यावर खड्डे पडणार नाही.’ असं चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

‘राज्याच्या ग्रामीण भागातील बरेच रस्ते हे रोजगार हमी योजनेत केले असल्याने त्याबाबत मी काहीही खात्री देऊ शकत नाही  आणि ते रस्ते ग्रामविकासच्या अंतर्गत येतात. पण त्यावेळी रस्त्यांपेक्षा रोजगार देणं गरजेचं होतं.’ असंही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, ’15 डिसेंबरमध्ये महाराष्ट्रात 96,000 किमीपर्यंतचे जे पीडब्ल्यूडीचे रस्ते आहेत. त्यावर आपल्याला एकही खड्डा दिसणार नाही.’ असा दावाही चंद्रकात पाटील यांनी याआधी केला होता. याचाच पुनरुच्चार आजही  त्यांनी केला.

संबंधित बातम्या :

15 डिसेंबरपर्यंत राज्यात एकही खड्डा दिसणार नाही : चंद्रकांत पाटील