एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 01/12/2017

1. मुंबईत पुन्हा काँग्रेस विरुद्ध मनसे राडा, मनसेकडून मुंबई काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या संदीप देशपांडेंना अटक, 7-8 कार्यकर्ते ताब्यात https://goo.gl/CC5TZT

2. मनसेच्या भित्र्या, नपुंसक, भेकड कार्यकर्त्यांचा हल्ला, संजय निरुपम आक्रमक https://goo.gl/gbxXh1 तर काँग्रेस कार्यकर्त्यांची मनसेविरोधात घोषणाबाजी, मनसेचे झेंडे जाळून कार्यालयावरील हल्ल्याचा निषेध https://goo.gl/gbxXh1

3. बीडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या घरी मुख्यमंत्र्यांची हजेरी, क्षीरसागर यांच्या भाजपप्रवेशाची जोरदार चर्चा https://goo.gl/DCWEaX

4. सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवारांना चौकशी समितीची क्लीन चिट, आक्षेपार्ह संभाषणाची ऑडिओ टेप बनावट असल्याचा समितीचा अहवाल https://goo.gl/2nrn2J

5. उत्तर प्रदेशमधील महापालिका निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय, 16 पैकी एकूण 14 महापालिकांमध्ये भाजपाचा महापौर, काँग्रेस आणि सपाला दणका https://goo.gl/cs68zv

6. नागपुरातील लॉटरी व्यापारी राहुल आग्रेकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपीची आत्महत्या, दुर्गेश बोकडेचा रायपूरच्या हॉटेलमध्ये गळफास https://goo.gl/tCUnM3

7. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मोर्चासाठी राहुल गांधींना निमंत्रण, शरद पवारांना श्रेय मिळू नये म्हणून काँग्रेसची खेळी, तर आजपासून राष्ट्रवादीच्या हल्लाबोल पदयात्रेला यवतमाळपासून सुरुवात http://abpmajha.abplive.in/live-tv

8. विविध योजनांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलेले तब्बल 151 चेक बाऊन्स, आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर https://goo.gl/YbDjkv

9. पुण्यातील वारजे भागात इलेक्ट्रिक दुकानाला आग, आगीत एटीएमही जळून खाक, गेल्या 15 दिवसातील दुसरी घटना https://goo.gl/TihHv6

10. आजपासून रस्त्यावर येणाऱ्या नव्या चारचाकी वाहनांना फास्ट टॅग बंधनकारक, केंद्र सरकारचा निर्णय, टोलच्या रांगेतून वाहनधारकांची सुटका होणार http://abpmajha.abplive.in/live-tv

11. कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडी यात्रेची तारीख ठरली, भराडी देवीची यात्रा शनिवारी 27 जानेवारी 2018 रोजी https://goo.gl/5dfvxo

12. नवी मुंबईतील नेरुळमध्ये ‘दशक्रिया’ सिनेमा बघण्यास गेलेल्या प्रेक्षकांना ‘ज्युली टू’चं तिकीट, मराठी सिनेमांची कमाई हिंदी चित्रपटांना? https://goo.gl/apGJ2e

13. पाकिस्तानी क्रिकेटर उमर अकमलच्या मृत्यूची अफवा, सोशल मीडियावर अफवांचं पीक, वैतागलेल्या अकमलकडून अफवांचं खंडन https://goo.gl/DSvk6U

14. ‘सैराट’च्या हिंदी रिमेकच्या शूटिंगला सुरुवात, ‘धडक’च्या पहिल्या शॉटचे फोटो समोर https://goo.gl/zEzjn5

15. बिग बॉसचं लोणावळ्यातील शूटिंग बंद होण्याची चिन्हं, चित्रीकरणाचा परवाना रद्द करावा, लोणावळा नगर परिषदेच्या चौकशी समितीची शिफारस https://goo.gl/xjquF6

एबीपी माझाची #ब्लॉगमाझा स्पर्धा 2017, तुमच्या प्रवेशिका पाठवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा https://goo.gl/L8AjKc

माझा विशेष : मनसेचा गनिमी कावा की हा षंढ हल्ला? विशेष चर्चा आज रात्री 9.15 वाजता फक्त एबीपी माझावर

BLOG : एबीपी माझाच्या प्रतिनिधी भारती सहस्रबुद्धे यांची ब्लॉग मालिका - #जिभेचे_चोचले : भारतीय वैविध्याचं दर्शन – 29 https://goo.gl/1HW9qb

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर