जालन्यात 60 लाखांच्या गुटख्यासह दीड कोटींचा मुद्देमाल जप्त
एबीपी माझा वेब टीम | 29 Jul 2016 03:20 PM (IST)
जालनाः जालन्यात 60 लाखांच्या गुटख्यासह दीड कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने ही कारवाई केली. शहरातील सूर्या रिसॉर्टवर हा छापा टाकण्यात आला. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने या छाप्यात गुटख्यासह गुटखा बनवण्याची सामग्री देखील जप्त केली जात आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या या कारवाईमुळे बेकायदेशीरपण्या गुटखा पुरवणारे चांगलेच हादरले आहेत. गुटखा बंदीनंतरही शहरात मोठ्या प्रमाणात गुटखा पुरवठा होत असल्याचं अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या निदर्शनास आलं होतं. त्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने ही कारवाई केली.