जयच्या शोध मोहिमेत तीन वेगवेगळ्या बातम्या समोर आल्या
पहिली बातमी- गळ्याला कॉलर लावलेला एक वाघ 12 जुलै रोजी चिचाड गावच्या सरपंचांना आढळून आला.
दुसरी बातमी- भंडारा-अड्याळ रोडवर जंगली गाय आणि रानडुकराची शिकार झाली होती. ती एखाद्या मोठ्या वाघाने केल्याची शक्यता आहे.
तिसरी बातमी- सालेभाटा परिसरात अनेकांना वाघाचं अस्तितत्व जाणवतंय.. तिथंही वनविभागाचा शोध सुरु आहे
जय हा आशिया खंडातला सर्वात मोठा वाघ आहे. ताडोबाच्या अभयारण्यातला जय उमरेडला आला. त्यासाठी जयने 100 किलोमीटरचे अंतर पार केले. प्रवासादरम्यान नद्या आणि महामार्गही ओलांडले. जय आल्यानंच उमरेड हे अभयारण्य घोषित झालं. उमरेडमध्ये जयने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं. अडीच वर्षात 7 नर आणि 2 माद्यांना जन्म दिला.
महाराष्ट्राच्या व्याघ्र संपदेतला सर्वात महत्त्वाचा वाघ बेपत्ता झाल्यानं व्याघ्र बचाओ मोहिमेला धक्का लागला आहे. आज जागतिक व्याघ्रदिन आहे. त्यामुळे जयच्या बेपत्ता होण्याने मोहिमेवर निर्माण झालेलं मळभ दूर करण्यासाठी जयला तातडीने शोधण्याची गरज आहे.