औरंगाबाद : ब्ल्यू बेल सोसायटी कोरोनाच्या युद्धाचा सामना करण्यासाठी आत्मनिर्भर झाली आहे. या सोसायटीने शहरातील कोरोना वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यांनी आपलं स्वतःच आयसोलेशन वार्ड तयार केला. 20 खाटांचा हा वार्ड डब्ल्यूएचओच्या गाईडलाईन नुसार सगळ्या सुविधा देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या युद्धात स्वतःसाठी isolation वार्ड तयार करणारी ही पहिलीच सोसायटी आहे.


औरंगाबाद शहराच्या प्रोझोन मॉलजवळ असलेली ब्ल्यू बेल सोसायटी. या सोसायटीने कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आपलं स्वतःचा आयसोलेशन वॉर्ड तयार केला आहे. गेल्या चार दिवसांपासून औरंगाबाद शहरात रोज 100 रुग्ण वाढत आहेत. कोरोना बाधितांची संख्या हजाराच्या पुढे जाऊन पोचली आहे. कोरोनाचा आलेख हा रोज चढताच आहे. अनेक रुग्णांना औरंगाबाद शहरातील रुग्णालयात बेड मिळणे मुश्किल झालं आहे. औरंगाबाद शहरातील रोजची वाढती रुग्ण संख्या पाहता, कोरोनाचा धोका लक्षात घेता उद्या सोसायटीतील लोकांना कोरोनाची बाधा झाली तर त्यांच्यासाठी हा वार्ड तयार केला आहे.



या आयसोलेशन वॉर्डमध्ये तीन भाग करण्यात आले आहेत. पहिल्या मजल्यावर जनरल वार्ड, दुसऱ्या मजल्यावर लेडीज वार्ड आणि तिसऱ्या मजल्यावर फॅमिली आणि चिल्ड्रन वार्ड तयार करण्यात आलाय या भागातील नगरसेवक राजू शिंदे यांनी ही कल्पना कशी सुचली या विषयी सांगितले. गणपती मंडळाच्या मीटिंगमध्ये कल्पना उदयास आली. यावर्षी गणपतीची स्थापना करायची नाही, तर असा वॉर्ड तयार करायचा यामध्ये एक एकमत झालं. कोणी बेड भेट दिले, कोणी गाद्या दिल्या, कोणी ऑक्सीजन सिलेंडर तर कोणी इतर साहित्य दिलं आणि सोसायटीतील एका बंगल्यात हा सुसज्ज आयसोलेश वार्ड तयार झाला.



तीन मजली या इमारतीमध्ये प्रत्येक रूम मध्ये दोन बेड ठेवण्यात आले आहेत. पीपीई किट, थर्मामीटर ऑक्सीमिटर प्रत्येक गोष्टी WHOच्या नियमानुसार देण्यात आलेल्या आहेत. ही सोसायटी 800 लोकांची आहे. आठ दिवसात या वार्डची निर्मिती झाली.



या सोसायटीमध्ये 2 एमडी डॉक्टर राहतात. त्यांनीही उपचार करण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे लोकांच मनोबल वाढलं. या सोसायटीने उभारलेला आयसोलेशन वार्डचा निर्णय निश्चितच कौतुकास्पद आहे. शहरातील सोसायटीमध्ये असे अनेक घर, धर्मस्थळे, क्लब हाऊस ओस पडली आहेत. तिथे अशी आयसोलेशन सेंटर उभे राहिले तर निश्चितच आरोग्य यंत्रणेला त्याचा फायदा होईल, यात शंका नाही. या सोसायटीचे आदर्श शहरातील आणि राज्यातील इतर सोसायट्यांनी घ्यायला हवा.


महत्त्वाच्या बातम्या : 


कौतुकास्पद... सांगलीच्या आटपाडीत क्वारंटाईन काळात गिरवले जात आहेत सैन्य भरतीचे धडे


#CoronaTestCenter तुमच्या जवळील कोरोना चाचणी केंद्र Google वर कसं शोधाल?