देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...





    1. कोरोनावर रामबाण उपाय सापडल्याचा योगगुरु रामदेवबाबांचा मोठा दावा, माझा कट्टयावर दिली औषधांची सविस्तर माहिती

    2. पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जूनला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार; राज्याच्या गृहमंत्री आणि आरोग्यमंत्र्याशीही संवाद साधणार

    3. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख पार, आतापर्यंत 47,796 रुग्ण कोरोनामुक्त; तर काल दिवसभरात 3493 नव्या रुग्णांची नोंद

    4. राज्यात जुलैपासून प्रत्यक्ष शाळा सुरु करण्याची शिक्षण विभागाची तयारी; मार्गदर्शक तत्वे तयार, मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीची प्रतीक्षा

    5. शिक्षण विभागाकडून ऑनलाईन शिक्षणासाठी गाईडलाइन्स तयार; विद्यार्थ्यांचे वय, मानसिकता विचारात घेणार

    6. सरकारने अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करू नये, परीक्षा घेण्याची आमची तयारी, पुण्यातील नामांकित शिक्षण संस्थांची भूमिका

    7. लवकर बरा होऊन घरी ये', पंकजा मुंडेंकडून कोरोना बाधित धनंजय मुंडे यांची आस्थेने विचारपूस; धनंजय मुंडेंवर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरु

    8. सोमवारी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड उद्धव ठाकरेंची भेट घेणार; अधिकांऱ्यांच्या बदल्यांसह इतर मागण्या सादर करण्याची शक्यता

    9. पहिल्याच सरीत नाशिकमध्ये गोदीवरीला पूर, महापालिकेने मान्सूनपूर्व काम वेळेत न उरकल्याचं उघड; रात्रभरात हळूहळू पाणी ओसरायला सुरुवात

    10. भेंडी बाजारातील धोकादायक जीर्ण इमारतींवर कारवाई का केली नाही?; मुंबई महानगरपालिका आणि म्हाडा प्रशासनाला मुंबई हायकोर्टाचा सवाल