Udgir : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा मराठी साहित्यप्रेमी जनतेचा एक आनंदाचा उत्सव असतो. दरवर्षी हे साहित्य संमेलन महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांत होत असते. ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली यंदाचे 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे पार पडणार आहे. यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) उपस्थित राहण्याची शक्यता आहे. हे साहित्य संमेलन 22, 23 आणि 24 एप्रिल रोजी पार पडणार आहे. या निमित्ताने उदगीर शहराचा थोडक्यात आढावा घेऊयात.
उदगीर हे महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्याचे मुख्यालय आहे. उदागिर बाबामुळे हे शहर प्रसिद्ध झाले. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या सीमावर्ती भागातील हे शहर आहे. लातूरपासून 70 किलोमीटर अंतरावरील उदगीर हे शहर मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. पानिपतला जाण्याची सुरुवात उदगीरपासून झाली. निजामाला हरवल्यावर सदाशिवभाऊ पेशव्यांना थोरल्या बाजीरावांचा पानिपतकडे जाण्याचा संदेश आला. उदगीरला ऐतिहासिक तसेच शैक्षणिक वारसासुद्धा लाभलेला आहे. उदगीर हे शिक्षणाच्या बाबतीत पुढारलेले शहर आहे. कृषी, विधी महाविद्यालय आहेत. तसेच महाराष्ट्रातील पाच पशु वैद्यकीय महाविद्यालयपैकी एक महाविद्यालय उदगीरमध्ये आहे.
पर्यटनासाठी उदगीर शहर प्रसिद्ध :
उदगीर हे शहर सुपारी फोडण्याच्या आडकित्तासाठी प्रसिद्ध आहे. लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ येथे भरते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या भारताच्या तिरंग्याचे कापडसुद्धा उदगीर येथे तयार केले जाते. उदगीर शहर पर्यटनासाठीही विशेष प्रसिद्ध आहे. यामध्ये उदगीरचा किल्ला, दुधियाहनुमान मंदिर, हत्तीबेट, साईधाम, सोमनाथपूर मंदिर यांसारखी इतर अनेक ठिकाणे प्रसिद्ध आहेत. उदगीर मधील कल्पना सिनेमागृह हे मराठवाड्यातील सर्वात मोठे म्हणजे 75mm आहे. उदगीर किल्ल्यामध्ये भट्टी आणि भिंतीचा किल्लेही जोडणारा एक खोल भुयारी मार्ग आहे. गडाची तटबंदी 40 फूट खोल खंदक, आणि सिवयल महल, सामुद्रधुनीय महंतांची समाधी तसेच साधारण भूप्रदेशापेक्षा 60 फूट आहे. त्याचे नाव हिंदू संत उग्रगिरि ऋषि यांच्या नावावरून केले गेले.
36 एकरात मंडप :
एप्रिल महिन्यातील उन्हाळा आणि अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेत मंडप व्यवस्था करण्यात आली आहे. जवळपास 36 एकर परिसरात मंडप उभारण्यात येत आहे. त्यामध्ये विविध सभागृह आणि पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तर मुख्य मंडपात 5000 लोकांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या :