कल्याण : ठाणे जिल्हा परिषद आणि पाच पंचायत समित्यांसाठी काल (बुधवार) झालेल्या निवडणुकांचे निकाल आता हाती येऊ लागले असून यात शिवसेनेची विजयाकडे वाटचाल सुरु आहे. तर भाजपला मोठा धक्का बसला आहे.


आत्तापर्यंत अंबरनाथ आणि कल्याण तालुक्याचा निकाल जाहीर झाला असून त्यात शिवसेनेनं बरीच आघाडी घेतली. अंबरनाथ पंचायत समितीच्या आठपैकी ७ जागा शिवसेना-राष्ट्रवादी युतीने जिंकल्या आहेत. तर जिल्हा परिषदेच्या ४ पैकी ३ गटातही शिवसेना-राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे.

कल्याण तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ६ जागांपैकी शिवसेना आणि भाजपानं ३-३ जागा जिंकल्या आहेत. तर पंचायत समितीच्या १२ जागांपैकी भाजपने ५, शिवसेनेनं ४ आणि राष्ट्रवादीनं ३ जागा जिंकल्या आहेत. अंबरनाथ आणि शहापूर तालुक्याप्रमाणे कल्याणमध्येही शिवसेना-राष्ट्रवादीची युती झाली, तर पंचायत समिती भाजपच्या ताब्यातून जाऊ शकते.

तिकडे भिवंडी तालुक्यात आत्तापर्यंत जाहीर झालेल्या निकालांमध्ये शिवसेनेनं ६ जागा जिंकत आघाडी घेतली आहे. तर भाजपाने ३, अपक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं प्रत्येकी १ जागा जिंकली आहे.

शहापूर तालुक्यात अद्याप मोजणी सुरु असून जिल्हा परिषदेच्या ११ गटांपैकी शिवसेना-राष्ट्रवादी युतीने ६ जागा जिंकल्या आहेत. तर पंचायत समितीच्या २२ जागांपैकी शिवसेना-राष्ट्रवादी युतीने आत्तापर्यंत १० जागांवर विजय मिळवला आहे. ही आकडेवारी पाहिल्यानंतर ग्रामीण भागातील मतदारांनी भाजपाला धक्का दिल्याचं पाहायला मिळतं आहे.

आत्तापर्यंतचे निकाल : 

अंबरनाथ तालुका :

जिल्हा परिषद गट – एकूण जागा ४ : शिवसेना-राष्ट्रवादी युती ३, भाजपा १

पंचायत समिती -  एकूण जागा ८ : शिवसेना-राष्ट्रवादी युती ७, भाजपा १

कल्याण तालुका :

जिल्हा परिषद गट – एकूण जागा ६ : शिवसेना ३, भाजपा ३

पंचायत समिती – एकूण जागा १२ : भाजपा ५, शिवसेना ४, राष्ट्रवादी ३

मुरबाड तालुका :

जिल्हा परिषद गट - एकूण जागा ८ : भाजपा ४, राष्ट्रवादी ३, शिवसेना १

पंचायत समिती – एकूण जागा १६ : भाजपा १०, राष्ट्रवादी ५, शिवसेना १

शहापूर तालुका : (मतमोजणी अजूनही सुरु)

जिल्हा परिषद गट - एकूण जागा 14 : शिवसेना 9, राष्ट्रवादी 5

पंचायत समिती -  एकूण जागा 28 : शिवसेना 18, राष्ट्रवादी 6, भाजप 3, अपक्ष 1

भिवंडी तालुका : (मतमोजणी अजूनही सुरू)

जिल्हा परिषद गट – एकूण जागा २१ : शिवसेना 8, भाजप 5, काँग्रेस, राष्ट्रवादी, अपक्ष प्रत्येकी १

पंचायत समिती – एकूण जागा ४२ : शिवसेना 15, भाजपा 14, काँग्रेस २, मनसे 1

संबंधित बातम्या :

LIVE : जि.परिषद, पं. समिती निवडणूक : कल्याण-अंबरनाथमध्ये शिवसेनेचा झेंडा