ठाणे : महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतरांचे वारे जोरदार वाहत आहेत. ठाण्यात निवडणुकांआधीच भाजपला धक्का बसला आहे. भाजपच्या विद्यमान नगरसेविका सुहासिनी लोखंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
सुहासिनी लोखंडे यांना पक्षानं उमेदवारी नाकारल्यामुळे त्या नाराज होत्या. त्यामुळे त्यांनी भाजपला रामराम ठोकत सेनेची वाट धरली आहे. लोखंडेंच्या शिवसेनाप्रवेशामुळे भाजपवर काय परीणाम होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
लोखंडे यांच्यासोबत माजी नगरसेवक सुनील लोखंडे, वॉर्ड अध्यक्ष राजेश शिंदे, कामगार आघाडीचे अध्यक्ष विजय साळुंखे, संजय पवार, राजू घरत यासारख्या पदाधिकाऱ्यांनीही ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे याच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
दहा महापालिकांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर 23 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे महापालिकांवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे.