ठाणे : ठाण्यात इलेक्ट्रॉनिक चीपद्वारे पेट्रोलच्या मापात पाप करणाऱ्या मास्टरमाईंडला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ठाणे पोलिसांनी कर्नाटकमधील हुबळीमधून प्रकाश नूलकरच्या मुसक्या आवळल्या.

इंधन भरण्याच्या यंत्रामध्ये छेडछाड करुन घोटाळा केल्याचं समोर आलं. पेट्रोल वेन्डिंग मशिनमध्ये झालेल्या छेडछाडीमुळे ग्राहकाला 4 ते 5 टक्के पेट्रोल कमी मिळायचं. म्हणजेच एका लिटरमागे जवळपास 20 मिलीलिटर इंधन लाटलं जात होतं.
त्यामुळे आधीच पेट्रोलचे भाव वाढत असताना ग्राहकांची मोठी फसवणूक व्हायची.

चिपद्वारे होत असलेली पेट्रोलचोरी पकडण्यासाठी ठाणे गुन्हे शाखेकडून राज्यभरात धाडसत्र सुरु आहे. मागील एक महिन्यात ठाण्यातील 98 पेट्रोलपंप सील करण्यात आले. ठाणे क्राईम ब्रान्चने मे महिन्यात प्रशांत नूलकरचा साथीदार विवेक शेट्येला अटक केली होती. त्यानेच ह्या चिप देशभरातील पेट्रोल पंपावर पुरवले होते.

प्रशांत नूलकर आणि विवेक शेट्ये यांच्यासह ठाणे पोलिसांनी याआधी सहा तंत्राज्ञांना अटक केली आहे. या तंत्रज्ञांनी हातचलाखी करण्यासाठी पेट्रोल मालकांना मदत केली होती.

दरम्यान, प्रशांत नूलकरला (56 वर्ष) आज मुंबईला आणण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या घोटाळ्यातील मास्टरमाईंड हाती लागल्यामुळे पुढील कारवाईला वेग येणार आहे.

संबंधित बातम्या

कारवाई थांबवा, नाहीतर बेमुदत संप, पेट्रोलपंप डीलर्सचा इशारा


चिपनंतर आता पासवर्डच्या मदतीनं पेट्रोलचोरी, 2 पेट्रोलपंप सील

पेट्रोल वेंन्डिंग मशिनमध्ये छेडछाड, 4 ते 5 टक्के पेट्रोल कमी

7 जिल्ह्यात 44 धाडी, 30 पंपांवर 'मापात पाप'

पेट्रोल वेंन्डिंग मशिनमध्ये छेडछाड, 4 ते 5 टक्के पेट्रोलची लूट

मापात पाप, भाजप आमदाराचा पेट्रोल पंप सील