बालमैत्रिणीवर गँगरेप करुन हत्या, ठाण्यातील मर्डर केसला वळण
एबीपी माझा वेब टीम | 06 Sep 2017 09:10 PM (IST)
दोन बालमित्रांनी तरुणीला अंबरनाथमध्ये पार्टीला बोलवलं होतं. यावेळी तिच्यावर गँगरेप झाला. मात्र तिने पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिल्याने तिला मारुन टाकण्यात आलं.
कल्याण : ठाण्यात हत्या झालेल्या नागपूरच्या तरुणीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. तरुणीवर तिच्याच बालमित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. तरुणीने पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिल्यानेच तिची हत्या केल्याची माहिती आहे. आरोपी अक्षय वालोदे आणि निकलेश पाटील यांनी आपल्याच बालमैत्रिणीची हत्या केली. दोघांनाही अंबरनाथला आणणार असून पोलिसांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. नागपूरला राहणाऱ्या तरुणीची ठाण्यात हत्या केल्यानंतर मृतदेह बेळगावात आढळला होता, तर आरोपींना रत्नागिरीत अटक झाली, असं काहीसं गुंतागुंतीचं प्रकरण उघड झालं होतं.