Thane Crime News :  ठाण्यातील काजूवाडी परिसरात मध्यरात्री भररस्त्यात रक्तरंजित राडा झाल्याची घटना घडली आहे. वाढदिवस साजरा करताना पाहिल्याने तरुणांनी चाकूचा हल्ला केला आहे. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. ही सर्व घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. तक्रारदारच नाही, तर आम्ही काय कारवाई करायची? असा आश्चर्यकारक सवाल पोलिसांनी केला आहे.  

Continues below advertisement

पोलिसांच्या भूमिकेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण

ठाण्यात भररस्त्यात चाकू हल्ले व गुन्हेगारी वाढत असताना पोलिसांच्या भूमिकेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. ठाण्यातील काजूवाडी परिसरात काल मध्यरात्री वाढदिवस साजरा करताना दोन तरुणांमध्ये एकमेकांकडे रागाने पाहण्यावरुन किरकोळ वाद निर्माण झाला. यश पवार आणि गौरव देवराज दरपे यांच्यातील हा वाद काही क्षणातच विकोपाला गेला आणि यश पवार गौरव या दोन तरुणांनी त्यांच्याजवळ असलेल्या चाकूने भररस्त्यात एकमेकांवर जीवघेणे हल्ले केले. या घटनेत दोघे जखमी झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताच वागळे पोलिसांनी काही तरुणांना ओळख पटवून ताब्यात घेतले आहे. मात्र या प्रकरणात कोणीही तक्रारदार पुढे न आल्याने अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. तक्रार देणारच नाही, तर आम्ही काय कारवाई करायची? असा सवाल पोलिसांनी उपस्थित केला आहे. तरीसुद्धा अशा प्रकारे भररस्त्यात चाकू हल्ले व गुन्हेगारी वाढत असताना पोलिसांची भूमिका किती प्रभावी आहे? असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून विचारला जात आहे.

धुळे शहरातील गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांच्यावर प्राणघातक हल्ला 

धुळे शहरातील गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांच्यावर गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे, या घटनेत बाबा धीरजसिंग यांच्या मानेला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. ही घटना घडल्यानंतर बाबा धीरज सिंग यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती, मात्र ते उपचारांना प्रतिसाद देत नसल्याने त्यांना मुंबई येथे हलविण्यात आले असून एअर ॲम्बुलन्सच्या मदतीने त्यांना मुंबई येथे नेण्यात आले आहे. बाबा धीरज सिंग यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देखील त्यांच्या निकटवर्ती यांनी दिली आहे.

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

Kalyan Marathi Family Beaten : कल्याणमध्ये मराठी कुटुंबावर हल्ला करणाऱ्या गुंडांच्या मुसक्या आवळायला सुरुवात, सीसीटीव्ही बघून प्रत्येकाचा माग काढणार