Nanded Murder Love Story: नांदेडच्या इतवारा परिसरात गेल्या आठवड्यात सक्षम ताटे या तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. सक्षमचे आचल मामीडवार या तरुणीशी प्रेमसंबंध होते. मात्र, जात वेगळी असल्यामुळे मामीडवार कुटुंबीयांना आचल आणि सक्षम ताटेचे (Saksham Tate) प्रेमसंबंध मान्य नव्हते. त्यामुळे आचलचे वडील आणि भावांनी सक्षम ताटे याची गुरुवारी संध्याकाळी गोळ्या घालून आणि डोक्यात फरशी घालून हत्या (Murder news) केली होती. यानंतर आचल मामीडवार हिने सक्षम ताटे याचे अंत्यविधी सुरु असताना त्याच्याशी प्रतिकात्मक लग्नाचे विधी पार पाडले होते. या दोघांच्या अंगाला हळद लावण्यात आली होती. यानंतर आचल मामीडवार (Anchal Mamidwar) हिने कपाळाला सक्षमच्या नावाचे कुंकू लावले होते. हा व्हिडीओ देशभरात व्हायरल झाल्यानंतर जातीय विखारातून घडलेल्या या घटनेला वाचा फुटली होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या पत्नी अंजली आंबेडकर यांनी सक्षम ताटे याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आचल मामीडवार आणि सक्षम ताटेच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी आम्ही संघर्ष करु, असे म्हटले. (Nanded Crime news)

Continues below advertisement

27 तारखेला सक्षम ताटे या तरुणाची हत्या झाली. त्याला आंतरजातीय मैत्रीची आणि बांधिलकीची खूप मोठी पार्श्वभूमी आहे. सक्षमसोबत असलेली मैत्री तोडावी, यासाठी आचलवर कुटुंबीयांकडून दबाव आणला जात होता, हे तिने व्हिडीओतून सांगितले आहे. ती 18 वर्षांची होण्यापूर्वी एकदा तक्रार करुन तिला पॉक्सोमध्ये अडकवले होते. पण आचल 18 वर्षांची आल्यावर तिने तो गुन्हा खोटा होता, माझ्यावर दडपण आणले होते, असे तिने सांगितले. ज्यादिवशी सक्षमची हत्या झाली त्यादिवशी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करायला आचलला पुन्हा पोलीस ठाण्यात नेले होते. पण तिने ठामपणे नकार दिला. आचलच्या म्हणण्यांनुसार, पोलिसांनीच तिच्या भावाला सांगितले की, तू एवढ्या प्रकरणांमध्ये पोलीस ठाण्यात येतो. त्यामुळे त्या मुलाला मार आणि मग पोलीस ठाण्यात ये. या सगळ्या गोष्टी आचलने तिच्या व्हिडीओत सांगितल्या आहेत. हे प्रकरण जात वर्चस्ववादातून घडले आहे. असे प्रसंग घडतात, तेव्हा मुलाची पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्ती होती, याचा जास्त बाऊ केला जातो. त्यामुळे घडलेल्या गुन्ह्याचं क्षुल्लकीकरण करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होतो, तो होऊ नये. सक्षम ताटे याचे कुटुंब सध्या प्रचंड दहशतीखाली आहे. गुन्हेगार अल्पवयीन असल्यामुळे तो लवकर सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे सक्षम ताटे याचे कुटुंब आणि आचलच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला संरक्षण पुरवणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. आचलच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च वंचित बहुजन आघाडी उचलेल, असे अंजली आंबेडकर यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित पत्रकारांनी, सक्षम ताटेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रकाश आंबेडकर हा खटला कोर्टात लढणार का, असा प्रश्न अंजली आंबेडकर यांना विचारला. सक्षमच्या कुटुंबीयांची तशी मागणी आहे, असे पत्रकारांनी सांगितले. त्यावर अंजली आंबेडकर यांनी म्हटले की, वंचित बहुजन आघाडी पाठीशी असताना त्याची फारशी गरज नाही. मात्र, सक्षमच्या कुटुंबीयांनी आज माझ्याकडे ही मागणी केली आहे. ही मागणी मी साहेबांच्या कानावर घालेन, असे अंजली आंबेडकर यांनी म्हटले.

Continues below advertisement

आणखी वाचा

बर्थडेला काटेरी गुलाबाचं झाड दिलं, आचलच्या भावांनी सक्षमला मनातील गोष्टींचा थांगपत्ताही लागून दिला नाही अन् वेळ येताच काटा काढला