Uddhav Thackeray On Congress And NCP : मी काही पाप केलेलं नाही, काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर जाऊन चुकीचे केलं नाही. माझ्याच लोकांनी मला धोका दिला पण ह्या दोन्ही पक्षांनी साथ दिली, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री महाविकास आघाडाची (Maha Vikas Aghadi) महत्त्वाची बैठक झाली. महाविकास आघाडीच्या डिनर डिप्लोमसीमध्ये उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेत बंडखोरी केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून वारंवार उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत जाऊन चूक केली, अशी टीका करण्यात येत होती. भाजपकडूनही यावरुनच उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात येत होता. आता उद्धव ठाकरे यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊन मी कोणताही चूक केली नाही, उलट माझ्या लोकांनी मला धोका दिला, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केले आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी महाविकास आघाडाची (Maha Vikas Aghadi) महत्त्वाची बैठक झाली. महाविकास आघाडीच्या डिनर डिप्लोमसीमध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), अजित पवार (Ajit Pawar), नाना पटोले उपस्थित होते. मविआमध्ये बंडखोरी होऊ नये यासाठी काळजी घेण्यासंदर्भात चर्चा झाली. कसबा (Kasaba Election) आणि चिंचवडसंदर्भात (Chinchwad Election) विजय आणि पराभवावर चर्चा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजप ही कीड आहे ज्यांच्यासोबत राहतात त्यांना संपवून टाकतात. आपण तिन्ही पक्ष एकत्र राहिलो तर कसबासारखे यांचे अनेक बालेकिल्ले उद्ध्वस्त करू शकतो. लोकसभा निवडणुकीत तिन्ही पक्षांनी एकत्र लढले पाहिजे. कोणत्या जागा देण्याबाबत काही तडजोडी कराव्या लागल्या तरी कराव्यात. नाहीतर 2024 लोकसभा शेवटची निवडणूक असेल, जे निकाल आले ते हवे असेल तर सगळ्यांनी एकत्र लढले पाहिजे.
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
लोकसभा निवडणुकीत तिन्ही पक्षांनी एकत्र लढले पाहिजे. कोणत्या जागा देण्याबाबत काही तडजोडी कराव्या लागल्या तरी कराव्यात. नाहीतर 2024 लोकसभा शेवटची निवडणूक असेल. जे निकाल आले ते हवे असेल तर सगळ्यांनी एकत्र लढले पाहिजे. मी काही पाप केलेलं नाही, काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर जाऊन चुकीचे केलं नाही. माझ्याच लोकांनी मला धोका दिला पण ह्या दोन्ही पक्षांनी साथ दिली. भाजप ही कीड आहे ज्यांच्यासोबत राहतात त्यांना संपवून टाकतात. आपण तिन्ही पक्ष एकत्र राहिलो तर कसबासारखे यांचे अनेक बालेकिल्ले उद्ध्वस्त करू शकतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आणखी वाचा :
Sharad Pawar: संजय राऊतांच्या वक्तव्यावर शरद पवार नाराज, मविआच्या बैठकीत राऊतांच्या वक्तव्यावर चर्चा