सोलापूर : सध्या राज्यात विविध प्रकरणावरुन राजकीय वातावरण चांगलच गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात ( Santosh Deshmukh murder case) मंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde) यांच्यावर जोरदार टीका होत होती. त्यामुळं अखेर धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा काल राजीनामा दिला आहे. त्यानंतर आज पुन्हा ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Guardian Minister Jaykumar Gore) यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाकडून आरोप करण्यात आले आहेत. जयकुमार गोरे यांनी एका महिलेला स्वतःचे विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केला आहे. त्यानंतर जयकुमार गोरे यांच्याविरोधात सोलापुरात ठाकरे गट आक्रमक झाला आहे.  

सिद्धेश्वराच्या पावन भूमित  नालायक पालकमंत्री नको, ठाकरे गट आक्रमक

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात सोलापुरात ठाकरे गट आक्रमक झाला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात सोलापुरात ठाकरे गटाची निदर्शने सुरु आहेत. जयकुमार गोरे यांनी एका महिलेला स्वतःचे विवस्त्र फोटो पाठवल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या आरोपनंतर सोलापुरात ठाकरे गटाने गोरे यांच्या विरोधात आंदोलन केलं आहे. सोलापूर ही सिद्धेश्वरांची पावन भूमी आहे. या भूमीत असला नालायक पालकमंत्री नको अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.  काल धनंजय मुंडे यांचा राजीनामा, आज जयकुमार गोरे यांचे हे प्रकरण, सुरेश धस यांना दोन दोन बायका, औरंगजेबची औलादी राज्य करतायत का? अशी टीका शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.  

संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, ठाकरे गटाची मागणी

संतोष देशमुखांची हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटानं आज पुण्यात केली आहे. शिवाय महिलांना अश्लील फोटो पाठवणाऱ्या जयकुमार गोरे यांची देखील मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, या मागण्यासाठी पुणे शहर ठाकरे गटाकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. पुण्यातील गुडलक चौकात या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाकरे गटाचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.  तसेच अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून त्यांच्या विरोधात सुद्धा घोषणाबाजी शिवसैनिकांनी केली. तसंच तानाजी सावंत, जयकुमार गोरे, वाल्मीक कराड, धनंजय मुंडे यांच्या फोटोला शिवसैनिकांनी शेण फासले.

महत्वाच्या बातम्या:

Jaykumar Gore : भाजपचा पश्चिम महाराष्ट्रातील पैलवान मंत्री आता वादाच्या भोवऱ्यात, जयकुमार गोरेंनी महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचे प्रकरण आहे तरी काय?