Parkinson's Disease: पार्किन्सन आजार हा एक न्युरो डिजनरेटिव्ह (म्हणजेच मेंदूची सक्रियता निष्क्रियतेमध्ये बदलण्याचा आजार) आहे. यामध्ये मेंदूतील पेशी हळूहळू निकृष्ट होत जातात आणि त्यानुसार शारीरिक हालचालींवर ही याचा परिणाम होतो.







साधारणतः वयाच्या पन्नाशीनंतर याची लक्षणे दिसू लागतात मात्र निदान पटकन होत नाही. याच पार्श्वभूमीवर पार्किन्सनचे (Parkinson's disease) निदान/ निश्चितता करणाऱ्या रक्त चाचणीचे संशोधन आयआयटी मुंबईकडून करण्यात आली आहे. केईम रुग्णालयाच्या सहयोगाने रुग्णांच्या छोट्या समूहावर या पेटंट मिळालेल्या तंत्रज्ञानाच्या वैद्यकीय चाचण्या सध्यस्थितीत सुरु आहेत. 


ज्येष्ठ नागरिकांना या संशोधनाचा विशेष उपयोग होणार असून यामुळे त्यांना त्यांच्या आजाराचे योग्य निदान वेळी झाल्याने त्यावर आवश्यक उपचार घेऊन उर्वरित आयुष्य सहज होऊ शकेल, असा विश्वास संशोधक प्राध्यापकांकडून व्यक्त करण्यात आला आहे.    


विशिष्ट्य प्रकारच्या विषारी प्रथिनांच्या मेंदूतील स्त्राव पार्किन्सन होण्यासाठी कारणीभूत होत असतो. हा स्त्राव मेंदूतील पेशी मृत होण्यास कारणीभूत ठरतोच शिवाय मेंदूला पोचणाऱ्या रक्तस्रावात ही अडथळा ठरून शारीरिक हालचाली मंद होण्यास कारणीभूत ठरत असतो. 


दरम्यान आयआयटी मुंबईने विकसित केलेले तंत्रज्ञान, रक्त असा थर जमा करण्यास मदत करते जो हे विषारी प्रथिने शोधण्यास मदत करते. या तंत्रज्ञानाची अचूकता 95 टक्के असल्याची माहिती या टीमचे प्रमुख आणि आयआयटीच्या डिपार्टमेंट ऑफ बायोसायन्स आणि बायोइंजिनिअरिंगचे प्रमुख प्रा. समीर माजी यांनी दिली. 


हे तंत्रज्ञान पुढे बाजारात आणण्यासाठी आयआयटी मुंबईमध्ये (Mumbai) सुनीता संघी सेंटर ऑफ एजिंग अँड न्यूरोडीजनरेटिव्ह डिसीज (एससीएएन - स्कॅन) ही सुरु करण्यात आले आहे. आयआयटीचे माजी विद्यार्थी शरद संघी यांच्याकडूनस निष्ठेला मिळालेल्या देणगीतून या सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. 


स्कॅन सेंटरसारखे व्यासपीठ हे संशोधक आणि अभियंते यांना एकत्रित येऊन न्यूरोडीजनरेटिव्ह आजारांचा सामना करण्यासाठी आयआयटी मुंबईमध्ये उपलब्ध झाले असल्याची प्रतिक्रिया प्रा. माजी यांनी दिली. 


सेंटरमध्ये भविष्यात मॉलिक्युलर, सेल्युलर, बायोकेमिकल मेकॅनिझम सारख्या विविध विषयावर अभ्यास होणार आहे. यामुळे मेंदूशी संबंधित विविध आजारांच्या (Parkinson's disease) निदानासाठी यामुळे व्यासपीठ तयार होणार असून आयआयटी मुंबईच्याच इंडस्ट्रियल डिझाईन सेंटर (आयडीसी) च्या माध्यमातून या तंत्रज्ञांची सुसंगत अशी साधननिर्मिती करण्याचा प्रयत्न असणार असल्याचे संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.