Wardha Accident: दोन महिन्यांपूर्वी घडलेली सात भावी डॉक्टरांचा अपघातात मृत्यूची घटना ताजी असताना त्याच अपघाताच्या जवळजवळ दीडशे मीटर अंतरावर रविवारी रात्री 11 च्या दरम्यान पुन्हा एक विचित्र अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर तीन गंभीर जखमी असून एक किरकोळ जखमी आहे. जखमींवर सावंगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी सावंगी पोलीसांकडून पुढील तपास सुरू आहे. 


सावंगी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सेलसुरा शिवारात विचित्र अपघात घडला आहे. जंगली रानडुक्कर आडवे गेल्याने इंडिका गाडी अपघातग्रस्त झाली.  टू व्हीलरने जाणारे दोन व्यक्ती त्याला मदत करण्यासाठी थांबले. एक व्यक्ती मदत करण्यासाठी गेला असता बालकासह आई रोडच्या कडेला उभे होते. मात्र त्याच वेळेस भरधाव वेगाने येणार्‍या चारचाकीने अपघात ग्रस्त कारला मागून जोरदार धडक दिली. तसेच रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या माय लेकांना उडवीले आणि टू व्हीलर ने यवतमाळला जाणार्‍या दोन लोकांना चिरडले मात्र या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर तीन गंभीर जखमी झाले आहेत. तर, एक किरकोळ जखमी झाला आहे मृतकामध्ये चार वर्षीय बालकाचा समावेश आहे


जखमी सहा लोकांना तात्काळ सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात नेले असता देवळी येथील म्हाडा कॉलोनी रहिवाशी चार वर्षीय रेयांश राकेश चाफलेला मृत घोषित केले तर येवतमाल जिल्ह्यतील दिघी गावचा रहिवाशी नरेंद्र भुराजी जुगनाके (28) याचाही मृत्यू झाला आहे अन्य तीन गंभीर असल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहे  गंभीर मध्ये येवतमाल जिल्ह्यातील दाभा पहुर गावचा रहिवाशी चंद्रशेखर वाट (30) ,देवळी येथील येथील रहिवाशी ललिता राकेश चाफले (36), पंजाबच्या बस्तर येथील रहिवासी गोल्डी सिंग (37) यांची स्थिती फार नाजूक असल्याचे रुग्णालयाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे तर नांदेड येथील रहिवासी जोग सिंग (32) किरकोळ जखमी आहे


फॉर्च्युनर गाडीही अपघातग्रस्त झाली आणि पुलाच्या खाली जाऊन आदळली मात्र वेळीच बलून उघडल्यामुळे कार मध्ये असलेल्यांना कोणतीही इजा झाली नाही मात्र ते सर्व घटनास्थळावरून पसार झाले आहे पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. अपघाताची माहिती मिळताच सावंगी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनाजी जळक आपल्या ताफ्यासह तात्काळ घटनास्थळी पोहोचले तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप अपघात झालेल्या ठिकाणाची स्वतः आले आणि अपघात कसा झाला याची माहिती जाणून घेतली.  


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha