मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांनी सह्याद्रीच्या पर्वत रांगात माशाची चौथी नवीन प्रजाती शोधून काढली आहे. अंबोली घाटातील हिरण्यकश नदीत सोनेरी रंगाचे केस असणारा माश्याची नवी प्रजाती तेजस ठाकरे यांनी शोधलीय. या माश्याची ही 20 वी  प्रजाती आहे. आणि तेजस ठाकरे यांनी शोधलेली चौथी प्रजाती आहे. या आधी त्यांनी सह्याद्रीच्याच पर्वत रांगात पालींच्या दुर्मिळ प्रजाती शोधून काढल्या होत्या.


माशाचं नाव 'हिरण्यकेशी' ठेवलं
त्यांना आंतरारष्ट्रीय स्तरावरील जीवशास्त्र मासिकांनीही प्रसिद्धी देऊन मान्यता दिली होती. आता हिरण्यकश नदीत शोधलेल्या या नव्या प्रजातीच्या माशाचं नाव 'हिरण्यकेशी' असं ठेवण्यात आलं आहे. याचा संस्कृत अर्थ सोनेरे रंगाचे केस असणारा असा आहे. माश्याच्या या नवीन प्रजातींना शोधण्यासाठी तेजस ठाकरे यांना अंडर वॉटर फोटोग्राफर शंकर बालसुब्रमण्यम आणि डॉक्टर प्रवीणराज जयसिन्हा जे रिसर्च पेपरचे प्रमुख आहेत, यांचे सहकार्य मिळालं.


आधी लावला होता  11 दुर्मिळ खेकड्यांच्या प्रजातींचा शोध
याआधी तेजस ठाकरे यांनी आणखी काही खेकड्यांच्या प्रजातींचा शोध लावला आहे. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये हिंडून तेजस यांनी तब्बल 11 दुर्मिळ प्रजातींचा शोध लावला होता. त्याआधी कला शाखेत दुसऱ्या वर्षाला शिकत असताना तेजस  यांनी खेकड्याच्या पाच प्रजाती शोधल्या होत्या. खेकड्यांच्या प्रजातींबद्दलचा त्यांचा हा शोधनिबंध न्यूझीलंडमधील ‘झुटाक्सा’ अंकात प्रसिद्ध  झाला आहे.  न्यूझीलंडच्या ‘झुटाक्सा’ हे नियतकालिक आणि वेबसाईटवर तेजस ठाकरे यांचं दुर्मिळ खेकड्यांविषयी दुसरं संशोधन प्रसिद्ध झालं होतं. विशेष म्हणजे पश्चिम घाटातील 'सह्याद्री' या रांगड्या मराठी नावावरुन एका खेकड्याचं 'सह्याद्रियाना' असं नामकरण करण्यात आलं होतं.


तेजस ठाकरेंनी शोधलेल्या खेकड्यांच्या प्रजातीवर अभ्यासाची परवानगी


सह्याद्री पर्वतरांगांमध्ये दुर्मिळ खेकड्यांच्या शोधामुळे वन्य जीव संपत्ती जतन करण्याचं महत्त्व पुन्हा अधोरेखित झालं आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जैवविविधता असून त्याचं संवर्धन अत्यंत गरजेचं असल्याची प्रतिक्रिया तेजस ठाकरे यांनी व्यक्त केली होती. कोकण, सातारा, कोल्हापूर आणि अहमदनगरमध्ये फिरुन तेजस ठाकरे यांनी दुर्मिळ जातीच्या खेकड्यांच्या प्रजातींचा शोध लावला होता. आता माशांच्या नव्या प्रजातींचा शोध त्यांनी लावला आहे.



तेजस ठाकरेंनी शोधलेल्या खेकड्याच्या प्रजातीला ठाकरे कुटुंबाचं नाव