आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे, शिक्षकाला अटक
एबीपी माझा वेब टीम | 04 Aug 2018 01:45 PM (IST)
आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींशी शिक्षकानेच अश्लील चाळे केल्याची घटना घडली. सतीश जाधव असं आरोपी शिक्षकाचे नाव आहे.
प्रातिनिधीक फोटो
यवतमाळ : आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींशी शिक्षकानेच अश्लील चाळे केल्याची घटना घडली. सतीश जाधव असं आरोपी शिक्षकाचे नाव आहे. हा सर्व प्रकार उघड झाल्यानंतर पोलिसांनी सतीश जाधवला बेड्या ठोकल्या आहेत. शिक्षकाच्या या कृत्यानंतर घाबरलेल्या पीडित मुलीने आश्रमशाळा अधीक्षिकेकडे तक्रार केली. त्यानंतर आणखी दोन मुलींसोबत हा प्रकार झाल्याचे पुढे आले. याप्रकरणी बाभूळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पीडित मुलींच्या तक्रारीनंतर बाभूळगाव पोलिसांनी सतीश जाधव याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. अशावेळी शिक्षकानेच हे घृणास्पद कृत्य केलं आहे.