शिर्डी/अहमदनगर : शिक्षकाने केलेल्या बेदम मारहाणीत सात वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना संगमनेरमध्ये उघडकीस आली आहे.
संगमनेरच्या गरोळे पठारमध्ये जिल्हा परिषद शाळेत दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला वाचता आलं नाही म्हणून शिक्षकाने छडीनं बेदम मारहाण केली.
या मारहाणीत विद्यार्थ्याच्या पोटावर, छातीवर आणि पायांवर वळ उठले आहेत. त्याला उपचारासाठी बोटा इथल्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. केवळ वाचता आलं नाही, म्हणून शिक्षकाने अमानुषपणे मारलं, असा आरोप विद्यार्थ्याच्या कुटुंबियांनी केलाय.
पोलिसांनी याप्रकरणी संबंधित शिक्षकाला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.