रेल्वे प्रवासातील केटरिंग सेवा, मेट्रो आणि उपनगरी रेल्वेचं तिकीट खरेदी करण्यासाठी रू. 500 ची नोट शनिवार, 10 डिसेंबरपासून चालणार नाही.. लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवास भाड्यासाठी जुनी रू. 500 ची नोट 15 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.. एसटीबाबतचा निर्णय महाराष्ट्र सरकार घेईल


---------------------

नागपूर : #नोटाबंदी निर्णयाविरोधात काँग्रेस आमदारांचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून  आंदोलन, पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे सहभागी

--------------------

जम्मू-काश्मीर : अनंतनागमध्ये भारतीय सैन्याच्या कारवाईत लष्कर-ए-तोयबाचे तीन अतिरेकी ठार

--------------------

ठाण्यात मोबाईल टॉवर सील करण्याची कारवाई, संध्याकाळपर्यंत 100 टॉवर सील करणार

--------------------

डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे 2000 रुपयांपर्यतच्या व्यवहारांवर सेवाकर लागणार नाही : पीटीआय

--------------------

कोल्हापूर :महापौरपदी राष्ट्रवादीच्या हसिना बाबू फरास यांची निवड, तर उपमहापौरपदी अर्जुन आनंद माने, इतिहासात पहिल्यांदाच शहराला मुस्लिम महापौर

--------------------

केंद्रापाठोपाठ राज्य मंत्रीमंडळाचीही पुणे मेट्रोला मंजुरी, अनेक वर्षे रखडलेल्या प्रकल्पाचा मार्ग मोकळा

--------------------

राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांची लवकरच नेमणूक, अधिवेशन संपण्यापूर्वीच राज्य सरकार नियुक्ती करणार, वर्षभरापासून अध्यक्षपद रिक्त

--------------------

राज्यातील मराठा, धनगर, मुस्लिम आणि लिंगायतांच्या आरक्षणासाठी विरोधक विधान परिषदेत आज नियम 260 अन्वये मांडणार प्रस्ताव, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे मांडणार प्रस्ताव

--------------------

अंदमान-निकोबार बेटाला वादळाचा तडाखा, वादळामुळे कालपासून 1400 पर्यटक अंदमानमध्ये अडकले

--------------------

सोलापूर-पुणे महामार्गावर देवडी फाट्याजवळ दुचाकी घेऊन जाणारा कंटेनर पेटला, 71 पल्सर गाड्या जळून खाक झाल्या, काल संध्याकाळची घटना

--------------------

हेडलाईन्स :

नोटाबंदीला आज महिना पूर्ण, रांगा कायम सुट्ट्या पैशांच्या चणचणीमुळे नागरिक बेहाल, आत्तापर्यंत साडे अकरा लाख कोटी जुन्या नोटा जमा

--------------------

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये वाचता न आल्याने शिक्षकाची 7 वर्षाच्या चिमुरड्याला बेदम मारहाण, मुलावर उपचार सुरु

----------------------

शिर्डीच्या पारेगावात जातीबाहेर लग्न केल्याने हाटकर कुटुंब वाळीत, जातपंचायतीची 27 लाखांच्या दंडाची मागणी, 10 जणांविरोधात गुन्हा

-----------------------

आर्थिक निकषांवर आरक्षणाचा कुठलाही विचार नाही, केंद्राचं स्पष्टीकरण, मराठा आरक्षणाला विलंब होत असल्याने कोल्हापुरात जाळपोळीचा प्रयत्न

---------------------

राज्यात टोलमुक्ती शक्य नाही, आयआरबीचे सर्वेसर्वा जयंत म्हैसकर यांचा दावा, सरकारचं आश्वासन हवेतच

----------------

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी आजपासून मुंबईत वानखेडेवर, मुंबईकर अजिंक्य रहाणेची दुखापतीमुळं माघार, भारताला मालिका विजयाची संधी