नाशिक : टाटा मॅजिक आणि मोटरसायकल यांच्यात येवला-नगरसोल रस्त्यावर अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

टाटा मॅजिक आणि मोटरसायकल याचा समोरा-समोर हा अपघात घडला. अपघातात मोटारसायकल स्वार आणि टाटा मॅजिकचा चालक जागीच ठार झाले. टाटा मॅजिक गाडी प्रवास्यांना घेऊन नगरसोल कडे जात होती. वडगाव शिवारतील कापसेवस्ती जवळ हा अपघात झाला. अपघातातील मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.

समोरा-समोर झालेल्या या अपघातात टाटा मेजिकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.  हा अपघात नेमका कशामुळे झाला आहे हे अद्याप कळू शकलेले नाही. परंतु पावसामुळे हा अपघात झाल्याची शंका व्यक्त होते आहे.

पावसामुळे अनेक अपघात झाले आहे. त्यामुळे वाहन चालकांनी वाहन चालवताना काळजी घेण्याची गरज आहे.