सातारा/मुंबईः पुण्यातल्या टेमघर धरणाच्या गळतीनंतर आता साताऱ्यातील तारळी धरणाला लागलेली गळती समोर आली आहे. धरण बांधल्यापासून ही गळती होत असून त्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. त्यामुळे परिसरातील गावांमध्ये घबराट पसरलीय.

 

दोषींवर कारवाई करु- गिरीश महाजन

 

विशेष म्हणजे या धरणाचं कामही अविनाश भोसले यांच्या सोमा इंटरप्रायजेस, पीआर कंस्ट्रक्शन आणि आणखी एका कंपनीनं मिळून केलं आहे. 'माझा'ने यासंबंधी बातमी दिल्यानंतर याप्रकरणी धरणाची पाहणी करुन दोषींवर कडक कारवाई करु, असं आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं आहे.

 

जलसंपदा विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

 

धरणाचं काम 1997 ते 2007 अशी दहा वर्ष सुरू होतं. सुरुवातीला 504 कोटींचं बजेट असलेल्या या धरणाचा खर्च 870 कोटी रुपये इतका झाला. मात्र तरीही धरणाचं बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचं झाल्याचं समोर आलं आहे.

 

जलसंपदा विभागाने गळती रोखण्यासाठी ठोस पाऊल उचलणं अपेक्षित होतं. मात्र त्याऐवजी माती टाकून गळती लपवण्यात आल्याचं उघड झालं आहे. त्यामुळं धरणाच्या भींतीच्या बाजूने ओढाच तयार झाला आहे. गळती रोखण्याचे जलसंपदा विभागाने प्रयत्न केले, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

 

संबंधित बातम्याः


टेमघरमधून रोज 5 कोटी 18 लाख 40 हजार लीटर पाणीगळती


टेमघर धरण प्रकरणी 33 जणांवर गुन्हे दाखल


टेमघर गळती: 'महाजनांकडून अविनाश भोसलेंना वाचवण्याचा प्रयत्न'


टेमघर धरणाचं काम निकृष्ट आणि धोकादायक : गिरीश महाजन


टेमघर धरणाप्रश्नी दोषींवर कारवाई करणारच : महाजन


टेमघरच्या पाणीगळतीने धरणाला धोका नाही : गिरीश महाजन