बुलडाणा: बुलडाण्यातील संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्याला तलाठ्याकडून शिवीगाळ केल्याची घटना समोर येते आहे. या शिविगाळीची ऑडिओ क्लिपही सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली आहे.


 

संग्रामपूर तालुक्यातील एकलारा बानोद गावातील शेतकरी किशोर वर्मा यांनी त्यांच्या सातबाराच्या कामासाठी तहसीलमध्ये अनेकदा अर्ज केले.

 

मात्र, तलाठीच कामावर नसल्यानं या शेतकऱ्यानं त्यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला. फोनवर या तलाठ्यांनी शेतकऱ्यांला अर्वाच्य भाषेत शिविगाळ केली. शेतकऱ्यानं ती सोशल मीडियावर पसरवली असून तलाठ्याविरोधात कारवाईची मागणी केली जाते.