Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या सभेच्या मुद्यावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांची 1 मे रोजी औरंगाबादेत सभा आयोजीत करण्यात आली आहे. मात्र, या सभेला मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसून येत आहे. अद्याप या सभेच्या परवानगीबाबत पोलिसांनी निर्णय घेतला नाही. त्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे. पोलिसांनी परवानगीबाबत लवकर योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही कोर्टात जाऊ असा इशारा मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी दिला आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या 1 मे च्या सभेला परवानगीसाठी अर्ज करुन आज चार दिवस उलटले आहेत. मात्र, पोलिसांनी याबाबत निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी राज ठाकरे यांच्या परवानगीबाबत लवकर निर्णय घेण्याची मागणी मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे. राज ठाकरे यांच्या सभेबाबत परवानगीचा योग्य तो निर्णय घ्या अन्यथा आम्ही कोर्टात जाऊ असा इशारा महाजन यांनी दिला आहे. त्यामुळे आता पोलीस प्रशासन आता याबाबत काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईत जाहीर सभा घेत मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली. त्यासोबतच महाविकास आघाडी सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर राज ठाकरेंनी ठाण्यातील सभेतून 3 मे पर्यंतचा अल्टिमेटमच दिला आहे. 3 मे पर्यंत जर भोंग्यांच्या संदर्भात निर्णय झाला नाही तर जशास तसे उत्तर देण्याचं म्हटलं आहे. त्यासोबतच 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी औरंगाबादेत जाहीर सभेचं आयोजन केलं आहे. पण या सभेला आता मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे. राज ठाकरेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून जोरदार तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. सभेच्या परवानगीसाठी पोलिसांकडे परवानगी सुद्धा मागितली आहे. मात्र, राज ठाकरे यांच्या 1 मे रोजी होणाऱ्या औरंगाबाद येथील सभेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग, ऑल इंडिया पँथर सेना, वंचित बहुजन आघाडी, प्रहार जनशक्ती पक्ष अशा विविध संघटनांनी विरोध दर्शवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- 'राज ठाकरे तेव्हा बोलायचे तर गुदगुल्या व्हायच्या, आता सत्य बोलतात तर खाजवायला होतंय' : देवेंद्र फडणवीस
- राज ठाकरे यांच्या भोंग्याच्या अल्टिमेटमनंतर मुंबई पोलीस सतर्क, दंगल झाल्यास पाच मिनिटात घटनास्थळी पोहोचणार