नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णाला या शेपटीपासून मुक्तता हवी आहे. जन्मजात शेपटी असलेला हा तरुण गेली 18 वर्षे हा अवयव आपल्या शरीरावर बाळगून आहे. पण जेव्हा तो असह्य झाला तेव्हा ती काढून टाकण्याचा निर्णय घेतला. यामुळे रुग्ण मानसिक तणावाखाली येऊन त्याला डिप्रेशनचा सामना करावा लागू शकतो.
जो अवयव माणसाला नाही, अशा अवयवाला काढून टाकण्याचं आव्हान डॉक्टरांसमोर आहे. काळानुरुप माणसाचे अनावश्यक अवयव गळून पडले, पण इथं उलटं झालं. एखाद्या माणसाला शेपटी असल्याचं उदाहरण जवळपास नाहीच. त्यामुळे या मारुतीरुपी रुग्णाला खचण्याची गरज नाही.