Swabhimani Shetkari Sanghtana MLA Devendra Bhuyar : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Swabhimani Shetkari Sanghtana Raju Shetti) यांनी महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सोडण्याचा इशारा दिला असला तरी त्यांच्या पक्षाचे एकमेव असलेले आमदार देवेंद्र भुयार काय निर्णय घेणार हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 5 एप्रिलच्या बैठकीनंतर मी माझा निर्णय ठरवेल. मला विश्वासात घेतलं तर आपण स्वाभिमानी सोबत असेल नाही घेतलं तर त्यांच्या शिवाय असा इशारा आमदार देवेंद्र भुयार यांनी एबीपी माझाकडे दिलेल्या Exclusive मुलाखतीमध्ये दिला आहे.


अमरावती जिल्ह्यात हिवरखेड येथे 24 तारखेला स्वाभिमानी संघटनेचा मेळावा होणार आहे. पण या मेळाव्यासाठी लावण्यात आलेल्या पोस्टर्स, बॅनरवर आमदार देवेंद्र भुयारांचा फोटो नसल्याने चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे. स्वाभिमानीच्या मेळाव्यावर बोलताना आमदार देवेंद्र भुयार म्हणाले की, या कार्यक्रमाची कल्पना राजू शेट्टींना नाही, त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या बडव्यांनी याचे आयोजन केले आहे. त्यामुळे त्या बॅनरवर माझा फोटो नाही असं ते म्हणाले. सोबतच स्वाभिमानी संघटना भाजपमध्ये जाईल असा कुठलाही निर्णय अद्याप राजू शेट्टी यांनी घेतलेला नाही अशी माहितीही आमदार भुयार यांनी दिली.


भुयार म्हणाले की, मी या कार्यक्रमाला जाऊ शकत नाही. कारण अधिवेशन सुरु आहे. माझा राजू शेट्टी यांच्याशी संपर्क आहे. ज्या लोकांनी मला निवडून दिलं त्यांच्या विश्वास मला सार्थ ठरवायचा आहे, त्यामुळं मी मतदारसंघात राहतो. मी सतत पश्चिम महाराष्ट्रात जात राहिलो तर मला इकडं फटका बसतो, असं ते म्हणाले. 


महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासंदर्भातील चर्चेवर बोलताना भुयार म्हणाले की, कुठल्या विषयावर संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडणार आहे, हा एक सवाल आहे. जे प्रश्न भाजपनं सोडवले नाहीत ते महाविकास आघाडी सरकारनं सोडवले आहेत. किमान समान कार्यक्रमातील बरेच मुद्दे सरकारनं सोडवले आहेत. वीजेचा प्रश्न सुटणे कठिण आहे पण शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला भाव असे अनेक प्रश्न त्यांनी सोडवले आहेत. 


विश्वासात घेतलं तर आपण आपला निर्णय घेऊ. नाही विश्वासात घेतलं तर त्यांच्याशिवाय राहू, असं भुयार म्हणाले. महाविकास आघाडीशी स्वाभिमानीचं कोणत्या कारणामुळं बिनसलं याबाबत काही कल्पना नाही, असं ते म्हणाले. एक दोन प्रश्न सुटले नसतीलही पण राजू शेट्टी भाजपमध्ये  जातील असं वाटत नाही, असंही भुयार म्हणाले. 



संबंधित बातम्या



शेतकऱ्याच्या पोराकडून कृषीमंत्र्यांचा पराभव, 'स्वाभिमानी' किसानपुत्र देवेंद्र भुयार विधानसभेत