Raju Shetti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांना मुंबईतील गिरगाव कोर्टानं (Girgaon Court) दिलासा दिला आहे. 2017 मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी प्रश्नावर आंदोलन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) राजू शेट्टींसह 21 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर या गुन्ह्यातून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुरव्यांअभावी सर्व आरोपींची कोर्टानं निर्दोष सुटका केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सात मार्च 2017 रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानभवनावर तूर, कांदा, कापूस आणि दूध या पिकांना हमीभाव मिळावा यासाठी आंदोलन करण्यात आले होते. यावेळी या आंदोलनामध्ये विधानभवनावरती तूर, दूध, कांदा आणि कापूस फेकून सरकारचा निषेध करण्यात आला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्यासह 21 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. याप्रकरणी गिरगाव कोर्टात या गुन्ह्यातून सर्व कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता न्यायालयाने केली आहे.
2017 साली केलं होतं आंदोलन
याप्रकरणाची सुनावणी गिरगाव न्यायालयात सुरू होती. सहा वर्षानंतर न्यायालयाने या गुन्ह्यातून राजू शेट्टी यांच्यासह सतीश भैय्या काकडे, प्रकाश पोपळे, रविकांत तुपकर , रवी मोरे, हंसराज बडगुले, प्रकाश बालवडकर, अमर कदम, जे पी. परदेशी यांच्यासह 21 कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता केली. सदर गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कामकाज अॅड. संदीप कोरेगांवे आणि ॲड. प्रवीण मेंगाने यांनी विनामुल्य केले. 2017 मध्ये तुरीचे, कांद्याचे, दुधाचे भाव प्रचंड पडले होते. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत होता. त्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत होते. याच मुद्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यामुळं स्वाभिमानीच्या वतीनं विदानभवासमोर आंदोलवन करुन सरकारच्या निषेध करण्यात आला होता. यावेळी विदानभवनावर कांदा, तूर फेकून आंदोलन करण्यात आलं होतं.
चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं जीवन संघर्षमय, संकटांशी आमची दोस्ती
चळवळीतल्या प्रत्येक कार्यकर्त्यांचं जीवन किती संघर्षमय असतं याचा आज मला पुन्हा एकदा प्रत्यय आला. आंदोलने वरवर जरी सोपे दिसत असली तरी त्यानंतरचा संघर्ष फार कठीण असतो असे रविकांत तुपकर म्हणाले. संकटांशी आम्ही दोस्ती केलेली असल्याने ती काही आमची साथ सोडत नाहीत. कितीही संकटे आली तरी मी त्यांना घाबरत नाही. येईल त्या परिस्थितीला धैर्याने सामोरे जाऊ, सोबतीला तुमचा खंबीर पाठिंबा असल्याचे तुपकर म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: