पेण आगाराची बस आपटा गावी वस्तीसाठी जाते. बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे ही बस पेणहून आपटा गावी जाण्यासाठी निघाली. आपडा गावात पोहोचल्यानंतर रात्री 11 च्या सुमारास गाडीत बॉम्बसदृश वस्तू असल्याचं चालक-वाहकाच्या लक्षात आलं. तातडीने त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर अलिबाग येथून बॉम्ब स्कॉड आपटा येथे रवाना झालं आणि त्यांनी आज सकाळी ही बॉम्बसदृश वस्तू निकामी केली आहे.
रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्करांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी केली आहे. दरम्यान रात्रभर ही एसटी बस पोलीस संरक्षणात ठेवण्यात आली होती. तसंच आपटा गावाला छावणीचे स्वरूप आलं होतं.रायगडमध्ये वस्तीच्या एसटी बसमध्ये सापडलेली बॉम्बसदृश वस्तू निकामी करण्यात यश
एबीपी माझा वेब टीम | 21 Feb 2019 07:26 AM (IST)