मुंबई : एसटी महामंडळातून निलंबित केलेल्या वाहकांना परिवहन मंत्र्यांनी मोठा दिलासा दिला आहे. अपहार प्रकरणी निलंबित वाहकांना पुन्हा सेवेत घेण्यात येणार असल्याची घोषणा दिवाकर रावतेंनी केली.
एसटी महामंडळातील 11 हजार 984 वाहक अपहार केल्याप्रकरणी निलंबित आहेत. या सर्वांना सुधारण्यासाठी एक संधी मिळावी म्हणून त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात येणार आहे.
परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी यासंदर्भात विधानसभेत घोषणा केली. त्यामुळे एसटी महामंडळातून निलंबित झालेल्या वाहकांना दिलासा मिळाला आहे.