बारामती : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते आज बारामतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचं उद्घाटन झालं. यावेळी सचिनला पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं चाहत्यांनी गर्दी केली होती. यावेळी टीम इंडियाचा स्टाईलिश फलंदाज अजिंक्य रहाणेही उपस्थित होता.


 

सचिननं औपचारिकरित्या या स्टेडियमचं उद्घाटन केलं.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यादेखील हजर होत्या.



अनेक सुविधांनी सज्ज असलेलं हे स्टेडियम मुंबईच्या वानखेडे स्टेडियमच्या पेक्षा मोठं आहे. त्यामुळे इथंही लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने होतील, अशीही शक्यता वर्तवली जाते आहे.

 

लोकार्पणानंतर या स्टेडियमवर मुंबई विरुद्ध महाराष्ट्र या संघात सामना रंगणार आहे.

आणखी फोटो  -


सचिनच्या हस्ते बारामतीत क्रिकेट मैदानाचं लोकार्पण


पवार साहेबांनी प्रेम आणि आदर दिला

 

यावेळी बोलताना सचिन म्हणाला, " पवार साहेबांनी प्रेम आणि आदर दिला. त्यांच्याबद्दल किती बोलावं, ते कळत नाही".



जेव्हा भारताने वर्ल्ड कप जिंकला, तेव्हा माझं स्वप्न अनेक वर्षांनी साकार झालं, असं सचिनने नमूद केलं.

 

"बारामतीत तरुणाई आहे, ते डायमंड आहेत, त्यांना पॉलिश करण्यासाठी गाईड असतात. इकडे मेहनत करुन तुम्ही बारामतीचं नाव मोठं कराल, पण या स्टेडियमसाठी ज्यांनी मेहनत घेतली, जेवढं पाणी वापरण्यात आलं, त्याकरता तुम्हीही घाम गाळून मेहनत करा" असा सल्ला सचिनने बारामतीच्या तरुणाईला दिला.

VIDEO: