मुंबई: प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) जर स्ट्राईक रेटवरून शिवसेना एकनाथ शिंदे यांची म्हणत असतील तर सातत्याने केंद्रात मंत्री असलेले रामदास आठवले (Ramdas Athawale) हेच आरपीआय चळवळीचे एकमेव नेतृत्व आहे असा जोरदार टोला शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी लगावला. एकनाथ शिंदे यांचा स्ट्राईक रेट हा उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त असून शिवसैनिक त्यांचीच शिवसेना मानतो असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं होतं. त्याला उत्तर देताना सुषमा अंधारे यांनी हा टोला लगावला.


काय म्हणाल्या सुषमा अंधारे? 


प्रकाश आंबेडकरांना उत्तर देताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, स्ट्राईक रेट सारखे शब्द वापरून शिवसेना पक्षाची मालकी कुणाची हे ठरत असेल तर मग आरपीआय चळवळीचा एकमेव माणूस सातत्याने खासदार आणि मंत्री म्हणून महाराष्ट्राच्या वतीने दिल्लीच्या राजकारणात आहे याचा अर्थ नेतृत्व फक्त आणि फक्त आठवले साहेबच करू शकतात ..! 


 




प्रकाश आंबेडकरांनी सांगितलेल्या सूत्रानुसार रामदास आठवले हेच आरपीआय चळवळीचे एकमेव नेतृत्व आहे असा अर्थ निघतो असा टोला सुषमा अंधारेंनी लगावला. 


काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर? 


प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की, "उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या मतांचा अभ्यास केला तर समजेल की एकनाथ शिंदे यांचा स्ट्राईक रेट सरळसरळ डबल आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की शिवसेनेची मतं एकनाथ शिंदे यांच्याकडे राहिली आहेत. आता शिवसैनिक एकनाथ शिंदे यांनाच खरी शिवसेना मानतो आहे. उद्धव ठाकरे यांचा स्ट्राईक रेट हा आरक्षणवादी आणि मुस्लीम यांच्यामुळे वाढला आहे." 


कुणबी मराठ्यांना मतदान करू नका, आंबेडकरांचे आवाहन


या आधी प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या एका भाषणात कुणबी मराठ्यांना मतदान करू नका असं आवाहन मतदारांना केलं होतं. ते म्हणाले होते की, "कुणबी मराठ्यांपासून सावध राहा. आताचं जे सभागृह आहे, त्यामध्ये 190 कुणबी समाजाचे आमदार आहेत. फक्त 11 आमदार हे ओबीसी समजाचे आहेत. कुणबी हा स्वत:ला ओबीसी म्हणत असला तरी तो सभागृहात मी मराठ्यांसोबत आहे, असे सांगतो. तो धनगरांसोबत नाही, तो माळ्यांसोबत नाही, तो वंजारी, लिंगायत, बंजारा यांच्यासोबत नाही. तो तेली, तांबोळी, कुणबी, लोहार, सोनार यांच्यासोबत तर अजिबातच नाही,"


ही बातमी वाचा: