मुंबई: राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आपल्या विरोधात अर्वाच्य भाषा वापरली तरी राज्य महिला आयोगाकडून त्यावर कारवाई करण्यात आली नाही, रुपाली चाकणकरांना आपण या संदर्भात दोन वेळा फोन केला पण त्यांनी तो उचलला नाही असा आरोप शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला आहे. जी कारवाई सु्प्रिया सुळे यांच्या प्रकरणात अब्दुल सत्तार यांच्यावर करण्यात आली ती कारवाई आपल्या प्रकरणात गुलाबराव पाटील यांच्यावर का करण्यात आली नाही असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.
शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, "मी महिला आयोगावर टिका करत नाही, तर महिला आयोगाच्या ही गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छिते की त्यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर कारवाई करावी. मी रुपाली चाकणकर यांना दोनवेळा गुलाब पाटील यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात फोन केला, पण चाकणकर यानी फोन उचलला नाही."
सुषमा अंधारे म्हणाल्या की, "माझा महिला आयोगालाही सवाल आहे की जर अब्दुल सत्तार यांना तुम्ही आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात नोटीस बजावता तर गुलाब पाटील यांना नोटीस का बजावत नाही. दोघेही गुन्हेगारच आहेत. राज्य महिला आयोगाने सिलेक्टिव्ह वागू नये. फक्त अब्दुल सत्तार यांना नोटीसा काढू नये."
काही दिवसांपूर्वी गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांचा उल्लेख नटी असा केला होता. त्यावरुन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात होती. त्याचा
नारायण राणेंना वाटत असेल की एकेरी भाषा वापरल्याने ते डॉन होतील, तर असं नाही, कोणी छपरी बोलून डॉन होऊ शकत नाहीत अशी टीका सुषमी अंधारे यांनी केली.
काय आहे प्रकरण?
राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचा 'नटी' असा उल्लेख करत त्या वसारलेलं भांडं असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यामुळे राज्यभरातील सर्व महिलांचा अपमान झाला असून मंत्र्यांनी महिलांबद्दल अशा पद्धतीने वक्तव्य करणे हे निषेधार्ह बाब आहे. त्यामुळे बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी उद्धव ठाकरे गटातर्फे जळगावात मोर्चा काढण्यात आला होता.
मंत्री गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी पोलिसांकडे केली आहे.