मुंबई : फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या प्रा. सुषमा अंधारे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये अज्ञातांनी हा हल्ला केला आहे. हल्ल्यामध्ये सुषमा अंधारे जखमीही झाल्या आहेत.
काल बुधवारी रात्री प्रा. सुषमा अंधारे कार्यक्रमातून परतत होत्या. यावेळी नंबर प्लेट नसलेल्या गाडीने त्यांच्या गाडीला तीनवेळा जोराची धडक दिली. यात सुषमा अंधारे यांच्या पाठीला मार लागला आहे.
इंदूरपासून 15 किलोमीटर अंतरावर घटना घडली आहे. प्रा. सुषमा अंधारे यांच्यावर उपचार सुरु आहेत.
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या प्रा. सुषमा अंधारे यांच्यावर हल्ला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 May 2018 07:29 PM (IST)
फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या प्रा. सुषमा अंधारे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये अज्ञातांनी हा हल्ला केला आहे. हल्ल्यामध्ये सुषमा अंधारे जखमीही झाल्या आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -