RBI Cut Down Repo Rate: रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात; गृहकर्ज, वाहन कर्जाचा हप्ता कमी होण्याची शक्यता
RBI Cut Down Repo Rate: रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक पतधोरण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत रेपो रेटमध्ये कपात करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. रेपो रेट आता 5.50 टक्के इतका झाला आहे.
RBI Cut Down Repo Rate: भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी रेपो रेटमध्ये कपात करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची द्वैमासिक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत रेपो रेटमध्ये 0.50 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही घोषणा केली. त्यामुळे रेपो रेटे आता 5.50 टक्के इतका झाला आहे. रेपो रेटमध्ये कपात झाल्यास बँकांकडून साधारणपणे गृहकर्ज आणि वाहन कर्जाच्या व्याजदरात कपात केली जाते. त्यामुळे फ्लोटिंग रेटने वाहन कर्ज आणि गृहकर्ज घेतलेल्या ग्राहकांचा महिन्याचा हप्ता कमी होऊ शकतो. तसे घडल्यास सामान्य नागरिकांना याचा मोठा फायदा होऊ शकतो. मात्र, आता बँकांकडून तातडीने रेपो रेटमधील कपातीनुसार व्याजदर घटवले जाऊ शकतात का, हे पाहावे लागेल. गेल्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या गृहकर्जाच्या व्याजदरात कपात केली होती. आता रेपो रेट 0.50 टक्क्यांनी कमी झाल्यामुळे स्टेट बँकेकडून गृहकर्जाचा व्याजदर आणखी कमी केला जाणार का, हे बघावे लागेल.
रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये कपात केली जाण्याची शक्यता उद्योगविश्वात वर्तविली जात होती. ही अपेक्षा खरी ठरली. गेल्या काही महिन्यांमध्ये देशभरात महागाईचा दर (Inflation Rate) आटोक्यात आहे. मात्र, भारतीय अर्थव्यवस्थेला अपेक्षित विकासदराचा आकडा गाठता आलेला नाही. या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांच्या हातात अधिक पैसा खेळता राहावा आणि बाजारपेठेत मागणी वाढावी, या उद्देशाने रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
ट्रेंडिंग
RBI News: रेपो रेट म्हणजे काय?
जेव्हा बँकांना पैशाची (Funds) गरज भासते, तेव्हा त्या RBI कडून कर्ज घेतात. या कर्जावर बँकांना जो व्याजदर (Interest Rate) द्यावा लागतो, तो म्हणजे रेपो रेट. त्यामुळे रेपो रेट कमी झाल्यास बँकांना रिझर्व्ह बँकेकडून कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध होऊ शकते. बँकांना कमी दराने कर्ज मिळाल्यास त्या ग्राहकांनाही कमी व्याजदराने कर्जपुरवठा करु शकतात. RBI रेपो रेटचा वापर अर्थव्यवस्थेतील तरलता (Liquidity) आणि चलनवाढ (Inflation) नियंत्रित करण्यासाठी करते.
Repo rate news: आरबीआयकडून सलग तिसऱ्यांदा व्याजदरात कपात
आरबीआयकडून सलग तिसऱ्यांदा व्याजदरात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या कर्जाच्या व्याजदरात कपात होणार आहे. आरबीआयनं सीआर रेशोमध्ये 1 टक्क्यांची कपात केली, कॅश रिव्हर्स रेशो 4 टक्क्यांवरून 3 टक्क्यांवर. महागाई दर आरबीआयच्या टॉलरन्स बॅन्डच्या खाली, 4 टक्क्यांच्या खाली राहणार महागाई दर. यंदाच्या आर्थिक वर्षात महागाई दर 3.7 टक्के राहण्याचा अंदाज, याआधीच्या बैठकीत महागाई दर 4 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला होता. भू-राजकीय तणाव आणि हवामानातील अनिश्चितता अडचणी निर्माण करत असल्याचं आरबीआयचं मत.आर्थिक विकास दर वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा प्रयत्न. यंदा रेपो रेट आणि सीआरआरमध्ये मोठी कपात करत पैसे लोकांच्या हाती देण्याचा आरबीआयचा प्रयत्न असल्याचे समजते.
आणखी वाचा