Manoj Jarange Patil : आज रायगडावर (Raigad) मोठ्या उत्साहत शिवराज्याभिषेक (Shivrajyabhishek) सोहळा संपन्न होत आहे. राज्याच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी रायगडावर दाखल झाले आहेत. ठोल ताश्यांच्या गजरात शिवरायांचा जयघोष सुरु आहे. मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील हे देखील रायगडावर दाखल झाले आहेत. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहेत तोपर्यंत मराठा समाजावर असाच अन्याय होत राहणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. आज रायगडावर मनोज जरांगेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलत होते.
6 जून रोजी एकच शिवराज्याभिषेक सोहळा होणे अपेक्षित
मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील जनतेला शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पृथ्वीतलावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशिवाय दुसरं कोणी मोठ नाही असे ते म्हणाले. किल्ले रायगडावर होणाऱ्या दोन शिवराज्याभिषेक सोहळ्याबद्दल जरांगे पाटील भडकले. असे व्हायलाच नाही पाहिजे. 6 जून रोजी एकच शिवराज्याभिषेक सोहळा होणे अपेक्षित आहे. दोन शिवराज्याभिषेक सोहळे करुन समाज दूषित होईल असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. दोन शिवराज्याभिषेक सोहळ्यामुळे सरकारची दुटप्पी भूमिका आहे असेही जरांगे पाटील म्हणाले.
किल्ले रायगडावर मोठ्या दिमाखात शिवराज्यभिषेक सोहळ्याला सुरुवात
किल्ले रायगडावर आज मोठ्या दिमाखात शिवराज्यभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली आहे. जगदीश्वर मंदिरातून राजेंची पालखी राजसद्रेवर पोहोचली आहे. यासाठी होळीचामाळ,, बाजारपेठ, राजसदर परिसरात मोठी गर्दी उसळली आहे. पालखी ला सुरक्षा म्हणून शिवभक्तांनी राजसद्रेवर जाणाऱ्या रस्त्याला वेढा घातला आहे. जेणेकरून राजेंची पालखी सुखरूप पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज यांचा 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा आज किल्ले रायगडावर संपन्न होत आहे .या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आज राज्यातील तीन ते चार लाख शिवभक्त गडावर दाखल झालेत. छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते हा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. याचा उत्साह गडावर पाहायला मिळतोय. आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवप्रमेमी रायगडावर दाखल झाले आहे. रायगड आणि आसपासचा परिसर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने दणाणून सोडला आहे. तसेच ढोल ताशांसह पारंपारिक वाद्य वाजवली जात आहेत. एकूणच आज रायगडावर मोठं उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या: