बीड : ऊसतोड कामगारांचे आंदोलन सध्या सुरू आहे त्यामुळे कोणताही ऊसतोड कामगार कारखान्यावर जाणार नाही अशी भूमिका ऊसतोड कामगारांची आहे. असे असताना देखील आज एका गाडीत 100 ऊसतोड कामगार एकत्रित बसवून चालले होते त्यांना अडवल्या नंतर पोलिसांनी माझ्यावर ही गुन्हा दाखल केला असे सांगून राज्यातील साखर कारखानदार ऊसतोड कामगारांचा संप मोडू पाहत आहेत आणि त्यांना पोलीस साथ देत असल्याचा आरोप भाजपचे विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे..


आज आष्टी ऊसतोड मजूरांचा संप सुरु असताना मालेगाव, नाशिक येथून काही ऊसतोड मजूरांना घेऊन जाणारे तीन ट्रक मिरजगाव जि.अहमदनगरच्या हद्दीत कर्जत तालुक्यातील अंबालिका या कारखान्यांवर हे मजूर चालले होते. सुरेश धस समर्थकांनी त्यांना थांबवून आष्टी येथे घेऊन आल्यानंतर या वाहनांमधून जवळपास 400 ते 450 मजूर आपल्या लहान मुलांसहीत कुठलीही काळजी न घेता जात असल्याचे आरोप सुरेश धस यांनी केलाय.


या ऊसतोड कामगाराला अडवले म्हणून पोलिसांनी सुरेश धस यांना अटक केले होते त्यानंतर सुरेश धस यांनी जामीन घेतला आणि त्यानंतर पोलीस स्टेशन बाहेर आल्यावर त्यांनी पोलिसावर ही टीका केलीय. या सत्तेचे परिणाम आष्टी शहरांमध्ये जाणवले कारण सुरेश धस यांना पोलिसांनी अटक केल्याच्या निषेधार्थ ऊसतोड कामगार आणि आष्टी शहरातील खडकत चौकामध्ये टायर जाळून निषेध नोंदवला.


सुरेश धस यांच्या मागण्या काय ?




  • ऊसतोडणी कामगारांची मागील पाच वर्षातल्या अंतरीम वाढीसह 150% वाढ द्यावी.तसेच मुकादमांचे 37 % पर्यंत कमीशन वाढवावे.

  • बैलगाडीचा दर 208 रुपये ज्यामध्ये (हेळक,मुंगळा,जुगाड,घंटा) तसेच डोकीसेंटर 239 रु.(ट्रक,ट्रॕक्टर टोळी) तर गाडीसेंटर 267 रु.अशा पद्धतीने आजचे दर आहेत.

  • या दराप्रमाने नवरा बायको ऊसतोड कामगार जोडीला 416 रुपये मिळतात. परंतु मिस्ञी,बिगारी कामगार इतर कामावर असलेले मजूर सकाळी 11 ते 5 या वेळेतच काम करतात तर ऊसतोड कामगार राञंदिवस काम करुनही त्यांना योग्य मोबदला मिळत नाही.

  • ते कारखान्यावर जनावरे सांभाळतात त्यांचा खुराक पेंडचा खर्च या सगळ्या गोष्टीचा विचार करता ऊसतोड कामगारांवर अन्याय होत आहे.त्यामुळे ऊसतोड कामागारांच्या गळतीचे प्रमाण मागील 5 वर्षात 60% वर गेलेले आहे.लोक ऊसतोडणीचा धंदा सोडून शहरात वाचमन होणे पसंत करत आहेत.

  • ऊसतोडणीत पैसा मिळत नसल्याने तो दुसरीकडे जात आहेत. या कारणांमुळे मुकादमांच्या संसाराचे वाटोळे झालेले आहे 18.5 % कमीशनवर भागत नाही. 3 रु.4 रु. शेकड्याने व्याजाचे पैसे घेतल्याने यात व्यावहारिकता जाणवत नाही. अनेक मुकादम यामुळे व्यसनधीन झालेले आहेत अनेकांनी आपली जीवनयाञा संपविली आहे त्यामुळे ही भाववाढ झाली पाहिजे.


ही भूमिका भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांची ऊसतोड कामगारांच्या संदर्भात आहे.


>