बीड : मराठवाडा हा एकमेव प्रदेश आहे, जिथे वर्षात चार वेळा ध्वजारोहण केले जाते. उद्या म्हणजे 17 सप्टेंबरला हैदराबाद मुक्ती संग्राम दिन साजरा होत असतानाच बीड जिल्ह्यातील शाळा आणि ग्रामपंचायत पातळीवरच्या कार्यालयांमध्ये ध्वजारोहण करावे का नाही, अशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्याला कारण ठरले आहे जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि तहसील कार्यालय यांच्यातील वेगवेगळे ध्वजारोहण संदर्भातील वेगवेगळे आदेश.
राज्यामध्ये सगळीकडे तीनवेळा ध्वजारोहण केले जाते. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि एक मे महाराष्ट्र दिन. मात्र हैदराबाद मुक्ती संग्राम दिन वेगळा असल्याने मराठवाड्यामध्ये चौथ्यांदा ध्वजारोहण केले जाते 17 सप्टेंबर हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन 2001 पासून साजरा केला जातो.
बीडच्या सामान्य प्रशासन विभागाकडुन दि. 14 सप्टेंबरला निर्गमित परिपत्रकाच्या प्रस्तावनेत हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे ध्वजारोहन करण्याबाबत विभागीय मुख्यालय, जिल्हा मुख्यालय व उपविभागीय मुख्यालय असे नमुद आहे तर अनुक्रमांक 04 मध्ये मराठवाड्यातील सर्व तालुक्यामध्ये असा उल्लेख आहे. अर्थात प्रत्येक शाळांत ध्वजारोहण करावे, असा उल्लेख नाही. तर सामान्य प्रशासन विभागाच्या पत्राच्या संदर्भाने बीड जिल्हाधिकाऱ्यांनी दि. 15 सप्टेंबरला परिपत्रक काढुन जिल्हा मुख्यालय, उपविभागीय मुख्यालय व तालुका मुख्यालया व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही ठीकाणी 17 सप्टेंबर 2020 हैदराबाद मुक्ती संग्राम दिन करण्याच्या सुचना नाही असे सांगितले आहे.
हातात फलक घेऊन ठिकठिकाणी उभं राहून बीडमध्ये गावकऱ्यांचं अनोखं आंदोलन
हे सामान्य प्रशासन व जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र सोशल मीडियाच्या माध्यमातुन जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालासह सर्व कार्यालयात पोहचले होते. लगेच आज हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या पुर्वदिनी दि. 16 सप्टेंबरला जिल्ह्याधिकाऱ्यांनी सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये व संस्थात 8.30 पुर्वी किंवा 9.30 नंतर झेंडावंदन करावे, असे सुधारीत निर्देश दिले. याच पत्राचा आधार घेवुन बीडच्या माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व शाळा-महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम साजरा करण्याचे पत्रक निर्गमित केले.
याहीपेक्षा कहर म्हणजे अंबाजोगाईच्या तहसीलदाराने तर आज दुपारी वेगळा आदेश काढून कोणत्याही शाळेमध्ये ध्वजारोहण करू नये असे सांगितले आहे. विशेष म्हणजे हे सगळे जे आदेश काढण्यात आले आहेत. ते सोशल मीडियावरून पाठवण्यात आलेत. जर आज दुपारनंतर ध्वजारोहण करण्यासंदर्भातचे आदेश सोशल मीडियातून पाठवले गेले असतील तर शाळां, ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत पोहोचले का? हाही प्रश्नच आहे. एकूणच हैदराबाद मुक्ती संग्राम दिनी ध्वजारोहन करण्याच्या आदेशा बाबतीत प्रशासनाचे वरातीमागून घोडे, असा प्रकार समोर आला आहे.
हैदराबाद लढ्याचा जाज्वल्य व संघर्षमय इतिहास समोर ठेवुन हैदराबाद मुक्तीसंग्राम साजरा केला जातो. अशावेळी अगोदर झेडावंदन करु नये व नंतर करावे अशा दोन निर्देशामुळे शासकीय निमशासकीय कार्यालये, संस्था, शाळा व महाविद्यालयात संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे.
Beed Oxygen Shortage | बीडमधील ऑक्सिजन प्लांटमधील क्षमता घटली,राज्यातील आरोग्यव्यवस्था व्हेंटिलेटरवर