इंदापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे ट्यूशन लावावी, असा सल्ला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.
तीन वर्षे अभ्यास करुनही राज्यातील प्रश्न सुटत नाहीत. मुख्यमंत्र्यांना चांगले सरकार चालवण्यासाठी ट्यूशन लावण्याची गरज आहे. राज्यात अजित पवार यांच्याइतकी चांगली ट्यूशन कोणीच घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी अजित पवारांकडे शिकवणी लावावी, त्यांची फीसुद्धा आम्ही घेणार नाही, अशी टिप्पणी सुप्रिया सुळे यांनी केली.
इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी नंबर एक या गावाच्या दौऱ्यावर असताना सुप्रिया सुळेंनी हा सल्ला दिला.
जर एखादा विद्यार्थी एकाच वर्गात तीन-तीन वर्ष बसून अभ्यास करत असेल, आणि तरीही तो पास होत नसेल, तर त्याला आपण ट्यूशन लावतो. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तीन वर्ष झाली तरी ते अजून अभ्यासच करत आहेत. त्यांना खऱ्या अर्थाने ट्यूशनची गरज आहे, असा सुप्रिया सुळे म्हणाल्या.
राज्य चांगल्या प्रकारे चालवायचे असेल, तर अजित पवार यांच्या इतकी चांगली ट्यूशन कोणीच घेऊ शकत नाही, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्याकडे ट्यूशन लावावी. त्याची फीसुद्धा आम्ही घेणार नाही, असं म्हणत त्यांनी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसह भाजपवरही सडकून टीका केली.
मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांकडे ट्यूशन लावावी : सुप्रिया सुळे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 May 2018 07:04 PM (IST)
देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांकडे शिकवणी लावावी, त्यांची फीसुद्धा आम्ही घेणार नाही, अशी टिप्पणी सुप्रिया सुळे यांनी केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -