त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील वाहनचालक गुजरातमधील पेट्रोल पंपावंर गर्दी करत आहेत.
राज्य बदलले की प्रत्येक राज्याची कर आकारणीही बदलते. त्याची प्रचिती नंदुरबारपासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या गुजरातमध्ये येत आहे.
महाराष्ट्रातील नंदुरबारमध्ये पेट्रोलचा दर 87 रुपये 40 पैसे आहे. तर गुजरातमधील पेट्रोलचा भाव 77 रुपये 90 पैसे आहे.
महाराष्ट्र पेट्रोलवर तब्बल 9 रुपये जास्त कर आकाराला जातोय. यामध्ये
- दुष्काळी कर 3 रुपये
- महामार्गावरील दारूबंदीनंतर घटलेले उत्पादन 3 रुपये
- शिक्षण कर 1 रुपया
- स्वच्छ भारत अभियान 1 रुपया
- कृषी कल्याण अभियान 1 रुपया
एकूण 9 रुपये कर आकारणी पेट्रोलवर सुरू आहे.
त्यामुळे नंदुरबारमधील वाहनचालक पेट्रोल भरण्यासाठी गुजरातमध्ये जात आहेत.
साहजिकच ज्या ठिकाणी दर कमी असतील त्याठिकाणी वाहनधारक पेट्रोल भरण्यासाठी गर्दी करणार. पण भारतात "वन नेशन वन टॅक्स" ची अंमलबजावणी कधी होईल आणि इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात पेट्रोल दर कधी कमी होतील याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
देशात सर्वात महाग पेट्रोल अमरावतीत
सलग 11 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यानं मोदी सरकारविरोधात तीव्र संतापाची लाट उमटताना दिसत आहे. आज पुन्हा पेट्रोल 30 तर डिझेलचा दर लीटरमागे 20 पैशांनी वाढला आहे. देशात सर्वात महाग पेट्रोल अमरावतीत मिळत आहे.
अमरावतीतील पेट्रोलचा आजचा दर 86.52 रुपये तर डिझेल 74.11 रुपये आहे. त्याखालोखाल सिंधुदुर्गात पेट्रोल 86.31 रुपये तर डिझेल 72.89 रुपये प्रति लिटर आहे.
संबंधित बातम्या
देशात सर्वात महाग पेट्रोल अमरावती, औरंगाबादमध्ये!