बारामती : ‘देवेंद्र फडणवीस यांचं सरकार वाचविणारे अदृश्य हात राष्ट्रवादीचे नाहीत. आणि कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला पाठिंबा देणार नाही.’ असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलं आहे. आज त्या एबीपी माझावर बोलत होत्या.
गेल्या तीन वर्षात अनेक प्रश्नावर सरकार पूर्णपणे अपयशी झाल्याचा गंभीर आरोपही यावेळी सुप्रिया सुळे यांनी केला आहे. तसंच खड्ड्यांच्या प्रश्नावरुनही सरकारवर निशाणा साधला.
दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्या वांरवार भेटी होतात. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाला की, ‘शरद पवार यांचे सर्व पक्षातील लोकांशी चांगले संबंध आहेत. पवारसाहेब कृषीमंत्री असताना मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी देखील त्यांच्या भेटीगाठी व्हायच्या.’ असं त्या यावेळी म्हणाल्या.
सरकारच्या जाहिरातबाजीवर जोरदार टीकास्त्र
“भाजप-शिवसेनेच्या सरकारला हात जोडून माझी नम्र विनंती आहे की, जाहिरातबाजीचे पैसे कृपा करुन बंद करा. कामाला लागा. ते पैसे गरीब शेतकऱ्याला, आमच्या अंगणवाडी सेविकेला, रस्त्यांसाठी आणि विकासकामांसाठी ठेवा. जाहिरातबाजी करुन काहीही होणार नाही. आज गरीब माणसाला त्या निधीची गरज आहे. सिलेंडरची सबसिडी वाढवा किंवा गरीब महिलांना द्या. कर्जमुक्त करण्यासाठी आमच्या शेतकऱ्यांना द्या, चांगला हमीभाव द्या. जाहिरातबाजीवरच्या खर्चातला निधी जर गरीब माणसाला दिलात, तर तुम्हाला दोन चांगले आशीर्वाद मिळतील.”, असे खासदार सुप्रिया सुळेंनी हात जोडून भाजप-शिवसेनेला म्हटले.
संबंधित बातम्या :
भाजप-शिवसेनेला हात जोडून विनंती.... : सुप्रिया सुळे
भाजप सरकारच्या पाठिशी राष्ट्रवादीचे अदृश्य हात नाही : सुप्रिया सुळे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Nov 2017 10:54 PM (IST)
‘देवेंद्र फडणवीस यांचं सरकार वाचविणारे अदृश्य हात राष्ट्रवादीचे नाहीत. आणि कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला पाठिंबा देणार नाही.’
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -