हडपसरमधील साधना शैक्षणिक संकुलामध्ये पवार चॅरिटेबल ट्रस्ट आणि ऑल महाराष्ट्र थांग असोसिएशनमार्फत मुलींना स्वसंरक्षणासाठीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. आज सुप्रिया सुळेंनीही स्वसंरक्षणाचे काही प्रकार आजमावून पाहिले. यावेळी सुप्रिया सुळे हातात ढाल-तलवार घेऊन प्रशिक्षणासाठी उतरल्या आणि त्यांनी प्रशिक्षकाशी दोन हात केले.
खासदार सुप्रिया सुळेंची तलवारबाजी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Nov 2018 03:01 PM (IST)
खासदार सुप्रिया सुळे स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षण वर्गामध्ये सहभागी होत तलवारबाजीचे धडे गिरवले.
NEXT
PREV
पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात महिलांना स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण देण्याची सुरुवात करण्यात आली आहे. हडपसरमधील साधना शैक्षणिक संकुलात मुलींसाठी प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे. आज या संकुलात मुलींसाठी प्रशिक्षण वर्ग सुरू होता. त्यावेळी सुप्रिया सुळेदेखील तिथे हजर होत्या. प्रशिक्षण वर्गामध्ये सहभागी होत सुप्रिया सुळे यांनी तलवारबाजीचे धडे गिरवले.
हडपसरमधील साधना शैक्षणिक संकुलामध्ये पवार चॅरिटेबल ट्रस्ट आणि ऑल महाराष्ट्र थांग असोसिएशनमार्फत मुलींना स्वसंरक्षणासाठीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. आज सुप्रिया सुळेंनीही स्वसंरक्षणाचे काही प्रकार आजमावून पाहिले. यावेळी सुप्रिया सुळे हातात ढाल-तलवार घेऊन प्रशिक्षणासाठी उतरल्या आणि त्यांनी प्रशिक्षकाशी दोन हात केले.
हडपसरमधील साधना शैक्षणिक संकुलामध्ये पवार चॅरिटेबल ट्रस्ट आणि ऑल महाराष्ट्र थांग असोसिएशनमार्फत मुलींना स्वसंरक्षणासाठीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. आज सुप्रिया सुळेंनीही स्वसंरक्षणाचे काही प्रकार आजमावून पाहिले. यावेळी सुप्रिया सुळे हातात ढाल-तलवार घेऊन प्रशिक्षणासाठी उतरल्या आणि त्यांनी प्रशिक्षकाशी दोन हात केले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -